Aadhaar Voter ID Link : मतदार ओळखपत्र आता आधार कार्डशी लिंक केले जाईल. मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरू करण्यात येणार आहे. ही मोहीम १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करणे ऐच्छिक ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली.
![]() |
| Aadhaar voter id card link |
मतदान ओळखपत्र व आधार कार्ड जोडणी
१ ऑगस्टपासून महाराष्ट्रात 'मतदान ओळखपत्र व आधार कार्ड जोडणी ' (Aadhaar Voter ID Link) मोहीम सुरू होणार आहे.अभियान सुरू झाल्यावर असे करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असणार आहे.आधार कार्ड आणि पॅन कार्ड परस्परांशी संलग्न झाले असतानाच आता आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राची जोडणी केली जाणार आहे. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्यभर 1 ऑगस्टपासून ही प्रकिया सुरू केली जाणार आहे.
मतदारयादीत दुबार नावे असणे,पत्ता अपूर्ण असे अनेक दोष मतदार यादीमध्ये आढळून येतात. या पार्श्वभूमीवर आता मतदार ओळखपत्र आधार लिंक करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. एकाच व्यक्तचे एकापेक्षा अधिक मतदार संघात किंवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी आहे का हे तपासण्यासाठी आधार क्रमांकाची जोडणी उपयुक्त ठरणार आहे.
Aadhaar-Voter Card Link
एखाद्या व्यक्तीचे नाव त्याच्या शहराच्या मतदार यादीत आहे. पण बराच काळ दुसऱ्या शहरात राहत असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे त्याचे नाव दुसऱ्या शहरातील मतदार यादीतही समाविष्ट होते. अशा स्थितीत दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत त्याचे नाव कायम आहे. एकदा आधारशी लिंक (Aadhaar-Voter Card Link) केल्यानंतर मतदाराचे नाव मतदार यादीत एकाच ठिकाणी असेल. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला फक्त एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे.
Link Aadhaar with Voter ID
मतदार ओळखपत्र आता आधार कार्डशी लिंक केले जाईल. मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्यासाठी निवडणूक आयोग महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून ही Link Aadhaar with Voter ID मोहीम सुरू करणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आता मतदारांची ओळख निश्चित करण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करण्यासाठी आणि एकाच व्यक्तीच्या नावाची एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी करण्यासाठी मतदार ओळखपत्राचा आधार म्हणून वापर करावा लागेल. मतदार संघ कार्डशी जोडला जाईल.(Aadhaar feed)
Aadhaar-Voter Card Link online process
घरी बसून आपण आपले मतदान ओळखपत्र आधार कार्डशी कसे लिंक करू शकता.
ऑनलाईन अर्ज कोठे उपलब्ध आहेत?
>> अर्ज क्रमांक सहा ब eci.gov.in , https://ceoelection.m व aharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मतदान ओळखपत्र आधार
कार्ड लिंक करण्यासाठी
खालील लिंक वर
👇
>> ऑनलाइन आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रमांक सहा ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमावर सुविधा उपलब्ध आहे.
मतदान कार्ड व आधार जोडणीसाठी आवश्यक कागदपत्र
अर्ज क्रमांक ६ ब मध्ये दर्शविलेल्या ११ पर्यायी कागदपत्रामध्ये मनरेगा जॉब कार्ड, फोटो असलेले बँकेचे किंवा पोस्ट ऑफिसचे पासबुक,आरोग्य स्मार्ट कार्ड व इतर कागदपत्रांचा समावेश आहे.
आधार क्रमांकाची जोडणी ऐच्छिक
मतदान कार्डासोबत आधार क्रमांकाची जोडणी करणे ऐच्छिक आहे. केवळ आधार सादर करण्यास असमर्थतेमुळे मतदार यादीतून मतदारांचे नाव काढले जाऊ शकत नाही, असे सांगण्यात आले.aadhaar feed to epic card
आपले मतदान कार्ड pdf
डाऊनलोड करण्यासाठी
खालील लिंक
क्लिक करा
👇
हे पण पहा 👉 आपल्या गावची मतदार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

0 Comments