कापसाचे भाव का पडले असावे ? | Kapus Bajar Bhav

  Kapus Bajar Bhav दिवाळी पुर्वी कापसाचे भाव साधारण पणे 8000-9000 रुपये होते.दिवाळीनंतर आयात शुल्क कमी करणे आणि निर्यात बंदी होईल ही अफवा पसरली आणि भाव आणखी कमी झाले.        


Kapus Bajar Bhav
Kapus Bajar Bhav

  Kapus Bajar Bhav

  कापसाचे भाव कमी का झाले असावे? 

           अर्थतज्ञांनी कापसाचा भाव 10,000-12000 रूपये क्विंटल पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात असताना, सातत्याने सुरू असलेली भाववाढ सध्या थांबली, कारण सध्या कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉन मुळे जगातील अनेक देशांनी निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. बाजारातील व्यापाऱ्यांनी या घडामोडीचा वेध घेत सावध पवित्रा घेत खरेदी करण्याची भूमिका घेतली आहे, परिणामी बाजारातील दर काही प्रमाणात कमी झाले आहे.

       दुसरीकडे कापड उद्योगातील वाढती महागाई व दाक्षिणात्य कापड लॉबीचा दबाव लक्षात घेता सरकार कापूस निर्यातीवर सरकार शुल्क आकारू शकते,असा एक अंदाज व्यक्त केले जात आहेत.सुरवातीला सरकार निर्यातबंदी सारखा किंवा आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी अफवा पसरवली गेली आणि भाव पाडण्यात आले होते हे आपणास माहित असेलच.'Kapus Bajar Bhav'

        निर्यातबंदी आणि आयात शुल्क कमी करणे हे निर्णय राजकीय तोट्याचा ठरेल म्हणून सीसीआय चा वापर करून बाजारातील भाव पाडण्याचा पर्याय केंद्र सरकार निवडू शकतो असा समज झाला.यामुळे सरकारची बदनामी होणार नाही आणि शेतकरीसुध्दा सरकारला दोष न देता, व्यापाऱ्यांमुळे सगळं झालं आहे असं समजून व्यापारांना दोष देतील असा सरकार कयास लावत असावे.

          मुळात सरकारच्या कापूस बाजारातील हस्तक्षेप आणि बंधनांमुळे व्यापाऱ्यांना नाईलाजाने शेतकऱ्यांकडील कापूस कमी भावाने खरेदी करावा लागत असावा. दुसरीकडे केंद्र सरकारने CCI ला सन 2015 ते 2020 पर्यंतचा तोटा भरून काढण्यासाठी 17,408.85 कोटी रुपये दिले आहे. या कालावधीत बाजारात येणाऱ्या एकूण कापसापैकी सीसीआयने फक्त 33% कापूस खरेदी केला आहे, उर्वरित 67% कापूस बाजारातील व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे.

         वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी स्पष्टीकरण दिले आणि भाव परत तेजीत असताना अचानक कापूस बाजार भाव का पडू लागले आहे. याचे काय कारणे असेल हे आपण पाहणार आहोत. 

Kapus Bajar Bhav

        CCI लाच तोटा का झाला आहे? हा तोटा भरून काढण्यासाठी सरकार या निधीचा वापर सीसीआयकडून कापसाचे भाव पाडण्यासाठी करू शकतो. CCI ने आजपर्यंत बाजारात कुठेही खरेदी सुरू केली नाही,पण आता कापूस खरेदी करायची,आणी कमी भावात रूई,सरकीची विक्री करून बाजारातील रूई, सरकीचे भाव पाडायचे, असा हा खेळ असू शकतो कारण सोयापेंड आयात करून व खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी करून सरकारने सोयाबीनचे भाव पाडले, त्यामुळे सरकारला मोठी बदनामी सहन करावी लागली. त्यामुळे सरकार हा ति  Kapus Bajar Bhav सरा कुटील डाव खेळण्याची दाट शक्यता आहे.

           निर्णय कोणताही घेतला किंवा झाला तरी "बळी" हा "कापूस उत्पादक शेतकरीच" ठरणार आहे आणि तेव्हा सरकारच्या कोणत्याही निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे.


यंदा कापूस उत्पादनात मोठी घट

        अंदाजानुसार देशभरात यंदा 320 ते 325 लाख गाठीच उत्पादन निघण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गतवर्षी हेच उत्पादन 350 ते 375 लाख गाठींपर्यंत होते. 40 ते 50 लाख गाठींच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.

  Kapus Bajar Bhav

 यावर्षी मराठवाड्यातील 446 पैकी 361 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे.तर 8 जिल्ह्यात मिळून कापसाचे सरासरी 15 लाख 94 हजार 312  हेक्टर क्षेत्र असताना जेमतेम 6 लाख 17 हजार 328 हेक्टर क्षेत्रावरच कापूस लागवड झालेली आहे. "Kapus Bajar Bhav" लागवडीत टक्केवारीचा हा आकडा 38.76 एवढा आहे.अतिवृष्टी,बोंडअळी,पावसाचा लहरीपणा या सगळ्याचा परिणाम म्हणून जिथे 7-8 क्विंटल प्रति एकर उतारा निघत असे तेथे 2-3 क्विंटल उत्पादन होते आहे. 

     मित्रांनो कापूस बाजार भाव संबधीत माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.

       सदरील लेखा मधील  कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 

Post a Comment

0 Comments