कापूस बाजार भाव का वाढले ? | Kapus Bajar Bhav

         Kapus Bajar Bhav आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणीच नसल्याने आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रभावामुळे लॉकडाऊन होईल की काय?  या भीतीने कापसाचे दर घसरले होते. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कमी दरात विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता आणि टप्प्य़ाटप्प्याने विक्री करण्याचा मार्ग पकडला त्यामुळे बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने कापसाच्या दरात वाढ झाली आहे.

Kapus Bajar Bhav
Kapus Bajar Bhav

Kapus Bajar Bhav

         शेतात होणाऱ्या उत्पादनापेक्षा बाजारपेठेत शेतीमालाला काय दर मिळतो आहे यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. हंगामाच्या सुरवातीला कापसाचे दर ₹ 10000/- प्रति क्विंटलपर्यंत गेले होते. मात्र,मध्यंतरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणीच नसल्याने आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रभावामुळे लॉकडाऊन  होईल की काय? या भीतीने 'Kapus Bajar Bhav' घसरले होते. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कमी दरात कापूस विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता.

टप्प्याटप्प्याने कापूस विक्री 

   शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापूस विक्री करण्याचा सल्ला देण्यात येत होता. त्याचे पालन केल्यानेच बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने कापसाच्या दरात वाढ झाली आहे. राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता कापसाला विक्रमी दर मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून 7 हजारावर आलेले दर आता थेट नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटलवर गेले होते.   

हे पण पहा 👉 खरीप पीक विमा 2021 निधी वितरीत,बघा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ..

साठवणूकीवर भर

  मागील काही दिवसांपासून कापूस दरात घट झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता.खरिप हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरातही मोठी घसरण झाली होती.त्यावेळी शेतकऱ्यांनी उत्पादनात घट होऊनही दर मिळत नसल्याने विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता आणि शेतकऱ्यांच्या याच निर्णयामुळे दिवाळीनंतर का होईना सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झालेली आपण पाहिली आहे. 

कापसाला मिळाले विक्रमी बाजार भाव

      कापसाचेही तसेच झाले आहे.सुरवातीला कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विटलचा दर मिळाला होता. मात्र नंतर दरात घसरण झाल्याने कापूस थेट 7 ते 8 हजार रुपये क्विंटलवर येऊन पोहचला होता.यावेळी सुध्दा शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला आणि चित्र बदलले. आता राज्यातील विविध बाजार समितीमध्ये  कापसाला मिळाले विक्रमी बाजार भाव आता दहा ते बारा हजार रुपये दर मिळात आहे. भविष्यातही आवक प्रमाणात राहिली तर यामध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कापूस उत्पादनात मोठी घट

   मागील वर्षी खरिपात कापसाचे क्षेत्र तर घटलेच होते शिवाय अवकाळी पावसामुळे कापासाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बोंड अवस्थेत असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बोंड वाढीवर त्याचा परिणाम झाला होता.तसेच ढगाळ वातावरणामुळे दिवसेंदिवस बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने कापूस उत्पादनात मोठी घट झालेली आहे. कापूस अंतिम टप्प्यात असताना झालेला अवकाळी पाऊस व त्यानंतरच्या वातावरणाचा सर्वाधिक परिणाम कापसावर झाला होता.परिणामी यावर्षी कापूस उत्पादनात मोठी घट झालेली आहे. 

जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी क्लिक करा 👇        

WhatsApp Group
Click here

कापसाचे भाव आणखी वाढणार ,पण किती? 

         अर्थतज्ञांनी कापसाचा भाव अजूनही 10,000-12000 रूपये प्रति क्विंटल पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे.दिवाळीनंतर आयात शुल्क कमी करणे आणि निर्यात बंदी होईल ही अफवा पसरली आणि भाव आणखी कमी झाले होते नंतर वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर भाव वाढले होते. भाव वाढणार असी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण चीन, अमेरिका, पाकिस्तान, बांग्लादेशातील घटलेले कापूस उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे भारतीय कापसाच्या पिकासाठी सोन्याचे दिवस येणार आणि कापसाचे भाव आणखी वाढणार पण किती  हे नक्की आहे. फक्त सरकारने कुटील डाव खेळू नये म्हणजे झालं.

कुसूम सोलर पंंप योजनेच्या सर्व माहिती साठी                                          👇

              👉 Click here👈


कापूस उत्पादक शेतकरी समाधानी

        घटलेल्या दरामुळे शेतकरी अडचणीत आला होता मात्र आता मिळत आसलेल्या दरांमुळे कापूस उत्पादक शेतकरी समाधानी दिसत आहे. कपासला राज्यातील  विविध बाजार समित्यांमध्ये चांगला भाव मिळत आसल्याने बाजार समितीतील कापसाची आवक वाढत आहे.कापूस खरेदी केंद्रावर वाहनाच्या रांगा दिसू लागल्या आहेत.यापुढेही कापसाच्या दरात तेजी कायम राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

आगामी काळात कसे असतील कापूस बाजार भाव ? 

आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भाव

  अमेरिकेतील दुष्काळ संपुष्टात येत असून हवामान अनुकूल आहे. यंदा चांगला पाऊस पडेल, त्यामुळे पेरणीचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज एजन्सी व्यक्त करत आहेत. महामारीनंतर मागणी आहे पण महागाईमुळे खरेदीत कमजोरी आली आहे. सध्याची घसरण ही अल्पकालीन असल्याचे म्हणणे आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये नवीन माल बाजारात येण्यास सुरुवात झाली की,किमतीत आणखी सुधारणा दिसून येते.जुन्या पिकाची किंमत - ICE कॉटन जुलै फ्युचर्स 11 वर्षांच्या उच्चांकावरून 20 सेंट किंवा 12.8 टक्क्यांनी घसरला आहे. 17 मे पासून जुन्या पीक-ICE कॉटन जुलै फ्युचर्समध्ये किंमत सुधारणा होत आहे. पण जर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता निर्माण झाली, तर कापसासारख्या औद्योगिक वस्तूंच्या किमती घसरतील.(आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भाव) 

हे पण पहा 👉 मुलगी असेल मिळणार 50 हजार रुपये

व्यापाऱ्यांचे बुकिंग सुरू


 भारतीय कापूस महाग असल्याने पुढील हंगामाची गरज ओळखून अनेक कॉटन उद्योजकांनी विदेशातून कापूस गाठी, सुताची मोठ्या प्रमाणावर बुकिंग केली. बहुतांश कापूस हा ब्राझील, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतून आयात होतोय. आयात शुल्क माफीमुळे कॉटन मार्केटमध्ये विदेशी कापसावर व्यापाऱ्यांच्या उड्या पडत आहेत.(व्यापाऱ्यांचे बुकिंग सुरू

आयात शुल्कमाफ

 देशात कापसाचे ३० टक्के उत्पादन घटले असताना १० टक्के शुल्कामुळे आयातही महागली होती. त्यामुळे कापसाचे दर प्रति खंडी १ लाख १० हजार रुपयांवर गेले.आता मात्र आयात शुल्क माफ केल्यानंतर देशात २० लाख कापूस गाठींची आयात झाली आकपाशीचा पेरा वाढून उत्पादनही वाढेल.

Kapus Bajar Bhav

मित्रांनो "Kapus Bajar Bhav" संबधीत माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.

       सदरील लेखा मधील  कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 

हे पण पहा 👉 100% अनूदानावर बसवा घरावर सोलर पॅनल 

हे पण पहा 👉 नवीन शेत रस्त्यासाठी कसा आणि कुठे करावा अर्ज

Post a Comment

0 Comments