Voter list |
आता ही सगळी माहिती घरबसल्या कशी पाहायची, हे आपण या लेखात पाहणार आहोत.
Maharashtra Voter List
आपल्या गावची मतदान यादी कशी पहायाची ?
आपल्या गावची मतदान यादी पाहण्यासाठी स्टेप फॉलो कराव्या लागतात.
१) मतदार यादी पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्ही कोणत्याही वेब ब्राउझरवर Election Commission of Maharashtra असं टाईप करून सर्च करा.
२)त्यानंतर तुमच्यासमोर ceo.maharashtra.gov.in म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी यांचे पेज ओपन होईल.
३) त्यानंतर Chief Electoral Officer, Maharashtra या पहिल्या लिंक वर क्लिक करा.
Maharashtra Voter List |
४) इथे आल्यानंतर Home या टॅब च्या सामोरं PDF Electoral Roll (Part wise) हा पर्याय पाहायला मिळेल.या वरती क्लिक करायचे आहे.
५)आता या ठिकाणी मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडायचं आहे. 'Maharashtra Voter List'
६) आणि मग Capcha code टाकायचा आहे म्हणजे समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी तुम्हाला इथं टाकायची आहे.
७) त्यानंतर Open PDF यावर क्लिक केले की तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी PDF स्वरुपात ओपन होईल.
Maharashtra Voter List |
पुढे मतदान केंद्राच्या तपशीलात मतदान केंद्राचं नाव, क्रमांक आणि पत्ता दिलेला असतो आणि त्यानंतर मतदारांची संख्या (महिला, पुरुष, तृतीयपंथी) दिलेली असते.
त्यानंतर गावातील मतदारांच्या नावाची यादी दिलेली असेत. यात मतदाराचं नाव, पती किंवा वडिलांचं नाव, घर क्रमांक, वय, लिंग ही माहिती दिलेली असते. अशा पद्धतीनं तुम्ही या यादीत तुमचं नाव शोधू शकता.
आपल्या गावाची मतदार
यादी pdf डाऊनलोड
करण्यासाठी खालील
लिंक क्लिक करा
👇
आपल्या वॉर्डातील उमेदवार आणि त्याची माहिती
ग्रामपंचायती मधील वॉर्डनिहाय उमेदवार आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र पहायचे असेल तर तुम्हाला खालील पध्दतीने पाहता येईल. सर्व प्रथम panchayatelection.maharashtra.gov.in असं टाईप करा.
नंतर तुमच्यासमोर राज्य निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन होईल. इथं तुम्हाला Affidavit by the final contesting candidates या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
नंतर Search Document नावानं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं तुम्हाला Local Body मधील पर्यायांपैकी ग्रामपंचायत हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर Division मध्ये तुमचे गाव ज्या विभागात येते तो विभाग निवडायचा आहे.
शेवटी जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव निवडायचं आहे.
ग्रामपंचायती आपल्या वॉर्डातील उमेदवार आणि त्याची माहिती मधील वॉर्डनिहाय उमेदवार निवडून त्यांचं प्रतिज्ञापत्र पाहता येईल.
मतदारांच्या संदर्भात सर्व फॉर्म
१) फॉर्म क्र.6
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज
२) फॉर्म क्र.7
मतदार यादीतील नावाचा समावेश करण्यास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज
३) फॉर्म क्र.8
मतदार यादीत दाखल केलेल्या तपशिलांच्या दुरुस्तीसाठी अर्ज
४) फॉर्म क्रमांक 8A
मतदार यादीतील नोंदी बदलण्यासाठी अर्ज
५) फॉर्म क्र.18
पदवीधर मतदारसंघासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचा दावा
६) फॉर्म क्र.19
शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचा दावा
७) फॉर्म क्र.2
सशस्त्र दलाच्या सदस्याची नोंदणी भाग-ए, संरक्षण सेवा भाग-बी, सशस्त्र पोलीस दल, भाग-सी, विदेशी सेवा
८) फॉर्म क्र.13 एफ
वर्गीकृत सेवा मतदारांच्या संदर्भात.
आपले मतदान कार्ड
pdf डाऊनलोड
करण्यासाठी खालील
लिंक क्लिक करा
👇
Maharashtra Voter List
हे पण पहा 👉 नविन मतदार ओळखपत्र काढण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments