राज्यात निर्धूर चुलींचे मोफत वाटप;असा करा अर्ज Nirdhur Chul Yojana

Nirdhur Chul Yojana : केंद्र सरकार तसेच सर्व राज्ये आपआपल्या राज्यात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत असते त्यासाठी महाप्रीत द्वारे महाराष्ट्रातील सर्व 38 जिल्यांतील रहिवाश्यांकरिता सदिच्छेने विनामूल्य पर्यावरणीय अनुकूल निर्धूर चुल वाटप अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. निर्धूर चुल योजना म्हणजे काय,पात्रता निकष, कागदपत्रे,ऑनलाईन अर्ज कसा फरायचा याची सगळी माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

biomass stove
biomass stove

Biomass Stove Yojana Maharashtra

 सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण निर्माण होते व चुलीवर जेवण बनवताना निर्माण होणारा धूर श्वसनाद्वारे महिलांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा,खोकला सारख्या आजारांना सामोरे जावे लागते.

जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी क्लिक करा 👇        

WhatsApp Group
Click here

   चुलीवर जेवण बनविण्यासाठी लाकडांची गरज भासते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केली जाते व जंगल तोडीमुळे पर्जन्यमानावर याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम परिणाम होतो तसेच जंगल तोडीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून न राहिल्यामुळे विहिरी आटत चालल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने निर्धूर चुल वाटप योजना (Biomass Stove Yojana Maharashtra) सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

निर्धूर चूल वाटप योजना 2022 पात्रता 

निर्धूर चूल वाटप योजना 2022 पात्रता पुढील प्रमाणे आहेत.

•• अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा. 

 •• अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा

•• तसेच अर्जदाराकडे LPG गॅस कनेक्शन नसावे.

Biomass Stove Scheme 2022

   पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूल (Biomass Stove Scheme 2022) मोफत वाटपासाठी निकषयोग्य पात्र रहिवाश्यांनी अर्ज करावेत. रहिवाशी अनुसूचित जातीचा असावा, गरिबी रेषेखाली असावा आणि एलपीजी  गॅस कनेक्शन नसावे. सर्व जिल्ह्यातील इच्छूक रहिवाश्यांनी दि.15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हानिहाय RM/DM-MPBCDC शी संवाद साधावा.निर्धूर चुलसाठी अर्ज करण्याचे आवाहन महाप्रितने केले आहे. (MAHAPREIT – A Subsidiary of MPBCDC, Govt of Maharashtra Company)

हे पण पहा 👉 100% अनूदानावर बसवा घरावर सोलर पॅनल 

Marathi Kayda Free Nirdhur Chul Yojana Documents / आवश्यक कागदपत्रे

>> आधार कार्ड

>> राशन कार्ड

>> रहिवासी पुरावा

>> मोबाईल नंबर 

>> ई-मेल आयडी

>> जातीचे प्रमाणपत्र

Free Biomass Stove Yojana Online Form 2022

 निर्धूर चूल योजना (Biomass Stove scheme) अर्ज करण्यासाठी https://maha diwa.vercel.app/ या वेबसाइटला भेट द्या.या  वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर, तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, पत्ता, तालुका, जिल्हा, इत्यादी संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरून अर्ज सबमिट करा. या योजनेची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेतली आहे. तसेच अधिक माहितीसाठी  https://mpbcdc.maharashtra.gov.in किंवा https://mahapreit.in या वेबसाइटला भेट द्यावी.योजनेतंर्गत निर्धूर चुलींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे,या योजनेची माहिती पुढे नक्की पाठवा."Free Biomass Stove Yojana Online Form 2022"

निर्धूर चूल योजना 2022

अर्ज करण्यासाठी

क्लिक करा 

👇

👉 Online Apply 👈

-----------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments