Angarak Chaturthi : कृष्ण पक्षातील चौथा दिवस, जो दर महिन्यात येतो, त्याला आपण चतुर्थी म्हणतो.जर ती मंगळवारी आली की तिला 'अंगारक चतुर्थी' म्हणतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण दर महिन्यात करतो, परंतु अंगारक चतुर्थीचे महत्त्व अधिक असते कारण हा योग वारंवार येत नाही. तो योग उद्या अर्थात १३ सप्टेंबर रोजी जुळून आला आहे. पाहूया अंगारकीचे आणखी महत्त्व काय आहे ते!जेव्हा मंगळवारी संकष्टी येते तेव्हा त्या दिवसाला अंगारकी चतुर्थी म्हटले जातेजेव्हा मंगळवारी संकष्टी येते.
![]() |
| Angarakhi chaturthi |
अंगारकी चतुर्थीचे पूजन (Angarak Chaturthi Pujan Marathi)
सकाळी उठून स्नान करावे आणि उपवास धरावा
त्यानंतर गणेशाची पूजा करून नमस्कार करावा. जास्वंदाचे फूल वहावे
लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजमान करावी
धूप, दीप, नेवैद्य दाखवावा आणि फुले अर्पण करावी
संध्याकाळी घरी आल्यावर चंद्रोदय झाल्यानंतर बाप्पाला दुर्वा वाहाव्यात आणि बाप्पाच्या आवडत्या उकडीच्या मोदकाचा प्रसाद दाखवावाशुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून घ्यावा. (Angarak Chaturthi Pujan Marathi)
हे पण पहा 👉कधी आहे घटस्थापना शूभमुहूर्त ? जाणून घ्या नवरात्री पुजा विधी महत्त्व कथा साहित्य सर्व माहिती
अंगारक चतुर्थी कथा (Angarakp Chaturthi Katha in Marathi)
या पुत्राने स्वर्गात राहून अमृतप्राशन केले आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान प्रसन्न झालेल्या श्रीगणेशाकडे मागितले. तर प्रसन्न झालेल्या श्रीगणेशानेसुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवाराची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारीका या नावाने ओळखली जाईल आणि संबंधित उपासकाला 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल. तसंच तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्या उपसकांमध्येही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील.
हे ही पहा 👉 पितृपक्षात चुकूनही 'या' गोष्टी करू नका,जाणून घ्या महत्त्व आख्यायिका सर्व माहिती
अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझे नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारका सारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रम्हांडातल्या आकाशातील ग्रहांमध्ये स्थान मिळेल. याशिवाय तू सदैव अमृत प्राशन करशील. त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले." अंगारक चतुर्थी कथा Angarakp"
संकष्टी चतुर्थी व्रत (Sankashti Chaturthi fast)
संकष्टी चतुर्थीला गणेशाचे भक्त सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात. संकष्टी म्हणजे संकटकाळात सुटका. भगवान गणेश, बुद्धिमत्तेचा सर्वोच्च स्वामी, सर्व अडथळे दूर करणारे प्रतीक आहे. म्हणून असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व बाधा दूर होतात. उपवास कठोर आणि फक्त फळे, मुळे आणि भाजीपाला उत्पादने खाणे आवश्यक आहे. संकष्टी चतुर्थीच्या मुख्य भारतीय आहारात साबुदाणा खिचडी, बटाटा आणि शेंगदाणे यांचा समावेश होतो. रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर भाविक उपवास सोडतात.'संकष्टी चतुर्थी व्रत "(Sankashti Chaturthi fast)"
अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ योग
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी 7.37 पर्यंत वृद्धी योग राहील आणि त्यानंतर अतिशय शुभ ध्रुव योग होईल. या दिवशी सकाळी 06:36 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:05 पर्यंत सर्वार्थसिद्धी योग असेल. यादरम्यान अमृत योगही राहणार आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ योग)
अंगारक चतुर्थी महत्व
अंगारकी चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा आणि त्यानंतर उपवास केला जातो. त्यामुळं आयुष्यात त्याचं चांगलं फळ मिळतं आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी आख्यायिका आहे. अंगारकी चतुर्थीला गणेशाला चार मुख आणि चार हात असल्यानं त्याच्या या रुपाला संकटमोचन गणेश असं म्हटलं जातं. मंगळदेवाने जेव्हा गणेशाचे तप केले होते तेव्हा प्रसन्न होऊन गणेशाने ही चतुर्थी मंगळवारी येईल, आणि त्याला अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखलं जाईल, असं वचन आणि वरदान दिलं होतं, तेव्हापासून ही प्रथा सुरु होऊन ही चतुर्थी फक्त मंगळवारी येत असते.
हे पण पहा 👉 बापरे...‘बाबा वेंगा’ यांनी 2022 सालाबाबत केलेल्या या भविष्यवाण्या वाचून घाम फुटेल
चंद्रोदयाची वेळ मुहूर्त,..
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी 7.37 पर्यंत वृद्धी योग राहील आणि त्यानंतर अतिशय शुभ ध्रुव योग होईल. या दिवशी सकाळी 06:36 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:05 पर्यंत सर्वार्थसिद्धी योग असेल. यादरम्यान अमृत योगही राहणार आहे.चंद्रोदय रात्री 8 वाजून47 मिनिटांनी आहे
घरातील सुख शांतीसाठी करा हा उपाय
घरात वाद-विवाद, क्लेश असतो त्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही. घरात जर लक्ष्मी नांदावी असे वाटत असेल तर घरात सुख-शांती असणे गरजेचे आहे. घरात सुख-शांती हवी असल्यास अंगारकी चतुर्थीच्या दिवशी घरात श्री गणेश यंत्राची स्थापना करावी. हे यंत्र खूप लाभकारी ठरते. श्री गणेश यंत्र स्थापन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.
हे पण पहा 👉ॲसिडीटी ने त्रस्त आहात पहा घरघुती उपाय आणि योगासने

0 Comments