Vastu Tips In Marathi अशा गोष्टी घरासमोर कधीही असू नये..

 Vastu Tips In Marathi : अनेक लोक असे असतात ज्यांच्या आयुष्यातील समस्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत,त्यांनी खूप प्रयत्न केले तरी समस्या जैसे थेच राहतात. कधी-कधी वास्तुशास्त्रही यासाठी जबाबदार असते. वास्तुशास्त्रात असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्यास व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळू शकते. यासाठी तुमच्या घरासमोर असणाऱ्या काही गोष्टी त्वरित काढून टाकल्या पाहिजेत. घराचे मुख्य दार कसे असावे.

Vastu Tips In Marathi
Vastu Tips In Marathi

घरा समोर अशा गोष्टी असु नये 

1 असे मानले जाते की घराच्या मुख्य प्रवेश द्वाराने सर्व प्रकारचं सौख्य समृद्धी आणि भरभराटी येते. अश्या परिस्थितीत घराच्या बाहेर घाण पाणी साचू नये. वास्तुनुसार जर हे पाणी घराच्या पश्चिम दिशेला साचले असल्यास धनहानी आणि अपयशाची भीती असते.

2 घराच्या बाहेर कधीही काटेरी झुडूप लावू नये. घराच्या समोर काटेरी झाड असल्यानं आपल्या शत्रूंची संख्या वाढते. तसेच कौटुंबिक मतभेद आणि आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडतो.

3) घराच्या बाहेर कचरा कुंडी नसावी किंवा कचरा साठू देऊ नये. वास्तू शास्त्रानुसार हे कष्टदायी आणि पैशांचे नुकसान होण्याचे सूचक आहे. 

4 मुख्य दारा समोर विद्युत खांब प्रगतीस अडथळा मानले जाते. 

5 घराच्या पुढे घनदाट झाड नसावे. हे वास्तुदोषाला कारणीभूत असतो.

जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी toch करा 👇        

WhatsApp Group
What's Aap

6 घराच्या पुढे वेल चढणे अशुभ मानले जाते. वास्तू विज्ञान नुसार हे विरोधक आणि शत्रूंच्या संख्येला वाढवते जे प्रगतीत अडथळा आणते.

7 वास्तुनुसार घराच्या उंबऱ्यावर म्हणजे मुख्य दारापासून उंच रास्ता असणं कष्टदायी आहे.

8 वास्तुशास्त्रानुसार ज्या झाडांमध्ये नेहमीच दुधासारखे काही द्रव्य बाहेर पडत असल्यास त्याला घराच्या मुख्य दारावर कधी ही लावू नये.

5. घरासमोर घाण पाणी साठू देऊ नका (घरा समोर अशा गोष्टी असु नये)  

दरवाजासमोर टाळण्याच्या गोष्टी (Gate distinction)

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरासमोरून पाणी वाहून जाण्याची चांगली व्यवस्था असावी, याची विशेष काळजी घ्या. घरासमोर पाणी साचल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार थांबतो. घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश वाढतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आर्थिक संकट, रोग आणि वितुष्ट येते.दरवाज्यासमोर मोठे झाड असल्याने घरातील मुले नेहमी आजारी पडतात.

हे पण पहा 👉कधी आहे घटस्थापना शूभमुहूर्त ? जाणून घ्या नवरात्री पुजा विधी महत्त्व कथा साहित्य सर्व माहिती

दरवाज्यासमोर नेहमी पाणी वाहते ठेवल्याने नेहमी आर्थिक नुकसान होत असते.

दरवाज्यासमोर मंदिर असेल तर घरात कधीच सुख नांदत नाही.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्तंभ (खांब) असतील तर त्या घरातील महिला नेहमी आजारी पडतात.

जमिनीच्या तुलनेत घराचा दरवाजा खोलगट भागात असेल तर घरातील मुख्य पुरुष व्यसनाधीन व नेहमी दु:खात बुडालेला असतो.

घरासमोर रस्ता, मंदिर असेल तर घरासमोर अधिक जागा सोडल्याने दोष नाहीसे होतात.(दरवाजासमोर टाळण्याच्या गोष्टी Gate distinction)  

मुख्य दरवाजासमोर काय ठेवावे 

१) मुख्य दरवाजासमोर मोकळी जागा असणे गरजेचे आहे, म्हणजे पूर्वीच्या भाषेत आंगण असणं होय, कारण मुख्य दरवाजातून (प्रवेशद्वारातून) आपल्या घरात विशिष्ट प्रकारची positive energy म्हणजे लक्ष्मी येत असते, येणारी लक्ष्मी ही राजमार्गाने आली पाहिजे, सन्मानाने आली पाहिजे.

२) आपल्या दरवाजासमोर दुसऱ्याचा प्रवेशद्वार चालत नाही, ते वास्तुशास्त्रास मान्य नाही, जागा मोकळी पाहिजे.

३) मुख्य प्रवेशद्वारासमोर चढता-उतरता जिना चालत नाही, चढता जिना असेल तर अडचण त्यात झाली पाहिजे, उतरता जिना असेल तरी चालत नाही, कारण खाली खड्डा आला, नुकसान जास्त होते.

४) दरवाजासमोर किंवा बाहेर कमीत कमी १० ते १५ फुट अंतर पाहिजे नाहीतर positive एनर्जी कमी होईल त्यामुळे चांगल्या संधी येण्याचं प्रमाण कमी होऊन प्रगती होणार नाही.

५) वास्तुशास्त्रात lift मान्य नाही, lift असणं हे आपल्या घराच्या दृष्टीने negative आहे.

६) दरवाजासमोर भिंत आली तरी अडचणी येतात.

७) एखाद्याचं घर, दुकान, रस्त्याला लागून आहे व घर व दुकानासमोर झाड, गटार, इलेक्ट्रीक खांब, कचरापेटी, इलेक्ट्रीकची लाल डिकी, दरवाजासमोर मंदिर, हॉस्पिटल असे काही आले म्हणजे त्याला द्वारभेद झाला असं म्हणतात, म्हणजे मुख्य दरवाजासमोर अडचण आली व ती घरात येते.

हे ही पहा 👉 पितृपक्षात चुकूनही 'या' गोष्टी करू नका,जाणून घ्या महत्त्व आख्यायिका सर्व माहिती

८) मुख्य दरवाजाच्या बाजूला चप्पल रॅक नको, आत व बाहेर मोकळी जागा पाहिजे, तसं नसेल तर common वास्तुदोष आहे, ह्याला पर्याय एक, ओपन स्पेस – तेथून चप्पलेचे कपाट हलवा, दूर ठेवा  "मुख्य दरवाजासमोर काय ठेवावे दरवाजासमोर टाळण्याच्या गोष्ट" 

Kitchen Direction As Per Vastu In Marathi

 मुख्य दरवाजावर गणपती अथवा कोणत्याही देवाचे फोटो वा मूर्ती असू नयेत. तसेच गणपतीची पाठ दिसेल अशी मूर्ती ठेऊ नये 

मुख्य दरवाजावर मूर्तीपेक्षा लक्षमीची घराच्या आतल्या दिशेने जाणारी पावले लावावी. यामुळे अधिक प्रगती होते.

 मुख्य दरवाजावर सुंदर आणि सजावट असणारी झाडे लावावी. जेणेकरून घरात सकारात्मक उर्जा येईलवास्तुशास्त्रानुसार घराच्या बाहेर आणि जवळपास या काही गोष्टी नसाव्यात.Kitchen Direction As Per Vastu In Marathi

Vastu Shastra Tips For Home In Marathi

  वास्तुशास्त्रानुसार घरातील गोष्टी योग्य दिशेला हव्यात, यासाठी काही वास्तू टिप्स (Vastu Tips In Marathi) आम्ही तुम्हाला या लेखातून दिल्या आहेत. वास्तुशास्त्र टिप्स (Vastu Shastra Tips For Home In Marathi) या वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घराची रचना करून घेऊ शकता. तर तुमच्या स्वयंपाकघराच्या रचनेसाठीही काही सोप्या टिप्स (Kitchen Direction As Per Vastu In Marathi) आम्ही दिल्या आहेत. याशिवाय वास्तुशास्त्रानुसार कोणते रंग (Vastu Shastra Color Tips For Home In Marathi) महत्त्वाचे आहेत याबाबत महत्त्वाची माहिती.

हे पण पहा 👉 बापरे...‘बाबा वेंगा’ यांनी 2022 सालाबाबत केलेल्या या भविष्यवाण्या वाचून घाम फुटेल

Post a Comment

0 Comments