एजाज पटेलचा भीम पराक्रम - एका डावात 10 विकेट्स | Ajaz Patel

 Ajaz Patel  मुंबईमध्ये जन्मलेल्या भारतीय वंशांच्या न्यूझीलंडच्या फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात नवीन विश्व विक्रम करत एका डावात 10 विकेट घेतल्या आहेत.

Ajaz Patel
  Ajaz Patel

  Ajaz Patel

        एजाज पटेल ने भारताच्या     पहिल्या डावात टीम इंडियाच्या     सर्वच्या सर्व म्हणजे 10 फलंदाजांना बाद  करत हा भीम पराक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सर्व फलंदाजांना बाद करणारा 'Ajaz Patel' जगातील फक्त तिसरा गोलंदाज ठरला आहे. याअगोदर अशी कामगिरी भारताच्या अनिल कुंबळे यांनी 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध केली होती तर इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांनी 1956 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका डावात १० विकेट घेतल्या होत्या.

        कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा एजाज हा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी एका डावात १० विकेट्स मिळवण्याची किमया साधलेले गोलंदाज बघूया. 

        1) जिम लेकर ( इंग्लड) 1956-  vs ऑस्ट्रेलिया

        2)अनिल कुंबळे (भारत) 1999 - vs पाकिस्तान

        3)एजाज पटेल (न्यूझीलंड) 2021 -vs भारत


Newzealand cricketer Ajaz Patel

      

   एजाज पटेल हा न्यूझीलंडच्या १९ वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय शिबीरातही सहभागी झाला तो वेगवान गोलंदाज म्हणून. एजाज मध्ये फिरकी गोलंदाजीची गुणवत्ता ठासून भरली होती. 

            न्यूझीलंडचे माजी फिरकीपटू दीपक पटेल हे गोलंदाजी प्रशिक्षक होते. दीपक पटेल यांनी एजाजला पाहिले आणि त्यांनी त्याला वेगवान गोलंदाजी सोडून फिरकीकडे आपला मोर्चा वळवायला सांगितला. पण Newzealand cricketer Ajaz Patel ही गोष्ट करण्यासाठी तयार नव्हता. त्यावेळी दीपक पटेल यांनी एजाजला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या तेव्हा एजाज हा वेगवान गोलंदाजी सोडून फिरकीपटू होण्यासाठी तयार झाला. 


Ajaz Patel childhood


  एजाजच्या आयुष्यात दीपक पटेल ही व्यक्ती खूप महत्वाची आहे. त्यांच्यामुळेच एजाज फिरकी गोलंदाजीकडे वळला आणि त्याने आज इतिहास रचला आहे. Ajaz Patel childhood


नाव- एजाज पटेल 

जन्म - 21 ऑक्टोबर 1988 (मुंबई- भारत) 

टिम- न्यूझीलंड Xl, न्यूझीलंड, 


एजाज पटेलची  आतापर्यंतची कामगिरी पाहूया


फलंदाजी- डावखुरा

कसोटी सामने 11 - धावा -80

टि-20 सामने 07 - धावा 07


गोलंदाजी- डावखुरा

कसोटी सामने 11 - विकेट्स -39

टि-20 सामने 07- विकेट्स -07


एजाज पटेल

 

मित्रांनो "एजाज पटेल" हा लेख आपल्याला कसा वाटला या विषयी कमेंट्स मध्ये कळवा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. शेअर करा.


     सदरील लेखा मधील  कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 




Post a Comment

0 Comments