School full-time reopen कोरोना काळात शिक्षण क्षेत्राची खूप मोठी हानी झाली असून आता कोवीड निर्बंधांमुळे झालेले शैक्षणिक नुकसानक भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले असून विद्यार्थी व पालक वर्गासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
![]() |
School full-time reopen |
शाळा पुर्ण क्षमतेने आणि पुर्ण वेळ भरणार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, अशा भागातून शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने दिनांक २० जानेवारी, २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये राज्यातील इ.१ ली ते १२ वी च्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करुन दि. २४ जानेवारी २०२२ पासून पुन्हा सुरु करण्याचे अधिकार महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना शाळा सुरु करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले होते.
महाराष्ट्रातील शाळा पुर्ववत सुरू होणार
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून राज्यातील सर्व आस्थापना / कार्यक्रमांवरील कोरोना विषयक निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्यात येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून 24 मार्च 2022 रोजीच्या आदेशानुसार खालीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या आहेत.
>> सर्वसाधारणपणे दरवर्षी माहे मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते.या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरूचे करण्याऐवजी इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी चे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असा निर्णय घेण्यात आला आहे.
>>माहे एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात. तसेच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येईल.
>>इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी च्या वर्गातील विद्यार्थ्याच्या परीक्षा माहे एप्रिल महिन्यातील ३ ऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात व निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे.
>> सकाळच्या सत्रात शाळा घेणे आवश्यक असल्यास अध्यापनाच्या तासिका पूर्णवेळ शाळेप्रमाणे घेण्यात याव्यात आणि दररोज 100 % विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
>> दिनांक २० जानेवारी, २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना देण्यात आलेले अधिकार अबाधित राहणार आहेत.
हे पण पहा👉 पगार खात्याचे (Salary Account) फायदे
कोरोना निर्बंधांमुळे शैक्षणिक नुकसान
दि.२४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा दि.०४ ऑक्टोबर,२०२१ पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. एकूणच राज्यातील कोरोनावाप्रदुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व महापालिका हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि.०१ डिसेंबर,२०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यातील सर्वच शाळा दि. १५ फेब्रुवारी,२०२२ पर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. "कोरोना निर्बंधांमुळे शैक्षणिक नुकसान" झाले होते ते आता भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत.
मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.
सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
0 Comments