Salary Account रोजच्या समाज माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचाऱ्याचे अपघाताने,आजाराने,नैसर्गिक मृत्यू होणाच्या बातम्या ऐकत / पाहत असतो. त्यामध्ये आपल्या परिवारातील काही सदस्य असतील किंवा मित्रपरिवार असतील. त्या घरातील कर्ता पुरुष अपघाती किंवा एखाद्या आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबावर येणारी आर्थिक बिकट परिस्थिती ही आपण आपल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी अनुभवले असेल किंवा पाहिली असेल. अशा परिस्थितीमध्ये आपले सॅलरी अकाऊंट किती महत्त्वाचे आहे आणि ते योग्य बँकेमध्ये ठेवणे किती महत्त्वाचे आहे. ज्यामुळे आपल्या अनुपस्थिती मध्ये आपल्या घरच्यांना आर्थिक मदत होईल. याची सगळी माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
|
Salary Account |
Salary Account (पगार खाते)
Salary Account कोण उघडू शकतो
भारतातील कोणतीही व्यक्ती केवळ वैध कागदपत्रे आणि खात्यात किमान शिल्लक राखण्यासाठी सांगितलेली रक्कम असल्यासच बँकेत बचत खाते उघडू शकते. तर केंद्र/राज्य सरकारचे कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी व्यक्ती पगार खाते उघडू शकते.कॉर्पोरेशन आणि कंपन्यांच्या विनंतीनुसार पगार खाते उघडले जाते जेथे संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःचे वेतन खाते मिळते.'Salary Account (पगार खाते)'
बचत खाते आणि पगार खाते फरक
👉बँकेत पैसे जमा करण्याच्या उद्देशाने बचत खाते उघडले जाते आणि वैध कागदपत्रे असलेली कोणतीही व्यक्ती ते उघडू शकते. पगार खाते सहसा कंपनी किंवा संस्थेद्वारे खात्यात पगार जमा करण्याच्या उद्देशाने उघडले जाते.
👉 प्रत्येक बँकेचे त्यांच्या बचत खात्यासाठी वेगवेगळे किमान शिल्लक निकष आहेत आणि प्रत्येक बचत खात्यात किमान शिल्लक असणे आवश्यक आहे.
पगार खाते उघडण्यासाठी किमान शिल्लक असणे आवश्यक नाही.
👉आपल्याला आपले बचत खाते पगाराच्या खात्यात रूपांतरित करू शकतो आणि ते नोकरीतील बदलामुळे किंवा तुमच्या नियोक्त्याचा तुमच्या संबंधित बँकेशी संबंध असल्यामुळे असू शकते. जर तुमचा पगार ठराविक कालावधीसाठी तुमच्या पगार खात्यात जमा झाला नसेल तर बँक तुमचे पगार खाते बचत खात्यात रूपांतरित करेल आणि त्या खात्यात किमान शिल्लक निकष लावेल.
👉 बचत खात्यावर आणि पगार खात्यावर व्याजदर समान दिला जातो.
👉कर्ज वाटप बचत खात्यात कर्ज मिळवणे सोपे आहे परंतु पगार खात्यापेक्षा सोपे नाही. तुमचे पगार खाते असल्यास कर्ज मिळणे सोपे आहे कारण तुमच्या नियमित पगारामुळे बँकेला सुरक्षा मिळते.
👉तुमच्या बचत खात्यासह क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता पगार खात्यापेक्षा कमी आहे. बँक तुमच्या पगारावर अवलंबून क्रेडिट कार्ड ऑफर करते आणि क्रेडिट कार्ड मंजूर होण्याची शक्यता जास्त आहे.
👉शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पगार खात्यावर किंवा सॅलरी अकाऊंट वर बँकेकडून मिळणारे
(शासनाचा कोणताही जीआर नाही की पगार खाते किंवा सॅलरी अकाऊंट याच बँकेत असावे. महाराष्ट्र शासनाने असा कोणताही जीआर काढलेला नाही. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना कोणत्याही बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट उघडता येऊ शकते.(संदर्भ दिनांक 31 ऑगस्ट 2020 वित्त विभाग मंत्रालय)
|
पगार खाते |
वेगवेगळ्या बँकेतील पगार खात्याचे फायदे
Benefits of Salary Account
👉अँक्सिस बँकेत (Axis Bank) पगार खाते
1) एखादा कर्मचारी अपघाती मरण पावला तर त्याच्या
कुटुंबीयांना 20 लाख रुपये दिले जातात
2) एखाद्या कर्मचाऱ्याचा नैसर्गिक किंवा आजाराने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत दिली जाते.
3) रुपये 2 लाख ते 15 लाख पर्यंतचा आरोग्यविमा फक्त 1,999 रुपये भरून दिला जातो.त्या विम्यामध्ये दोन मुले व पती पत्नी यांचा समावेश होतो.
4)शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि कुटुंबासाठी 20 हजारापर्यंत मोफत मेडिक्लेम
👉 बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) पगार खाते
1) अपघाती निधन झाल्यास 40 लाख
2) कायम अपंगत्व आल्यास 40 लाख
3) कमी प्रमाणात अपंगत्व आल्यास 20 लाख
4) अपघाती उपचारासाठी 1 लाख मदत
5) हवाई अपघात झाल्यास कुटूंबास 1 कोटी रुपये मदत
6) नैसर्गिक मृत्यू मदत मिळत नाही
7) मेडिक्लेमची कोणतीही मदत नाही
8) RUPEY PLATINUM ATM CARD विमा 2 लाख वेगळा मिळतो.
👉बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) पगार खाते
1) अपघाती निधन झाल्यास 40 लाख मदत.
2) पूर्णता अपंगत्व आल्यास काही मदत नाही.
3) नैसर्गिक मृत्यू झाल्यास कोणतीही मदत नाही.
4) आरोग्य विमा कोणतीही मदत नाही.
5) विमान अपघात कोणतीही मदत नाही.
👉बँक ऑफ इंडिया(Bank of India) पगार खाते
1) अपघात विमा 30 लाख
2) पूर्ण अपंगत्व 30 लाख
3) कमी अपंगत्व 15 लाख
4) मेडिक्लेम कोणतीही मदत नाही
5) नैसर्गिक मृत्यू. कोणतीही मदत नाही
6) विमान अपघात कोणतीही मदत नाही
👉स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये पगार खाते
1) अपघाती निधन 20 लाख रुपये
2) ATM विमा 5 लाख रुपये
3) हवाई अपघात 30 लाख रुपये
4) नैसर्गिक मृत्यू झाल्यास कोणतीही मदत नाही.
5) आरोग्य विमा कोणतेही मदत नाही
6) ओअर ड्रॉप कर्ज सेवा उपलब्ध ( दोन महिन्याच्या पगारा एवढी OD अत्पल्य व्याज दरात उपलब्ध )
|
SGSP Form |
Benefits of Salary Account
SGSP Salary Package (SGSP)
SGSP Salary Package (SGSP) हे पगाराचे असे पॅकेज आहे जे राज्य सरकारे तसेच त्यांना नोकरी देणाऱ्या सरकारी संस्था यांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केले आहे. SGSP पॅकेज फक्त सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशातील कायम कर्मचाऱ्यांना लागू होईल जे त्यांचे वेतन खाते SBI मध्ये ठेवतात.
गृहकर्ज, वाहन कर्ज आणि एक्सप्रेस क्रेडिट कर्जावरील सवलत उपलब्ध असेल आणि त्यानंतर पुनरावलोकनाच्या अधीन राहून ती सुरू ठेवली जाईल. SGSP खात्याचे 4 प्रकार आहेत. या प्रत्येक प्रकारांमधील फरक खातेधारकाच्या पदनाम आणि निव्वळ मासिक उत्पन्नावर आधारित आहे. खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते.
👉SGSP प्लॅटिनम खात्याचा हा प्रकार अशा कर्मचाऱ्यांना ऑफर केला जातो ज्यांचे एकूण मासिक उत्पन्न रु. 1 लाख किंवा त्याहून अधिक आहे.
👉SGSP डायमंड खात्याचा हा प्रकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑफर केला जातो ज्यांचे मासिक उत्पन्न रु. 50,001 ते रु. 1 लाख दरम्यान असते.
👉SGSP Gold खात्याचा हा प्रकार 20,001 ते रु. 50,000 दरम्यान सकल मासिक उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना दिला जातो.
👉SGSP सिल्व्हर खात्याचा हा प्रकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑफर केला जातो ज्यांचे एकूण मासिक उत्पन्न रु.5,000 ते रु.20,000 दरम्यान आहे.
Corporate Salary Package (CSP)
Corporate Salary Package (CSP) अंतर्गत वेतन खाती कॉर्पोरेट संस्थांच्या कर्मचार्यांना अनेक विशेषाधिकार देतात, ज्यात रुग्णालये, हॉटेल्स, वाहतूक कॉर्पोरेशन इत्यादी सेवा संस्थांचा समावेश आहे. कॉर्पोरेट/संस्था आणि बँक यांच्यातील व्यावसायिक संबंधांवर अवलंबून पॅकेज कस्टमाइझ केले जाऊ शकते.
कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज (CSP) ची पात्रता निव्वळ मासिक वेतनानुसार आहे.
👉प्लॅटिनम: वरील 1,00,000/-
👉डायमंड: 50000/- च्या वर आणि 100000/- पर्यंत
👉गोल्ड: 25,000/- च्या वर आणि 50,000/- पर्यंत
👉सिल्व्हर: 10,000/- दरम्यान आणि 25,000/- पर्यंत
हे डेबिट कार्ड, विमा कव्हरेजचे प्रमाण,लॉयल्टी प्रोग्राम फायदे इत्यादीसाठी तुमची पात्रता निश्चित करेल.
ॲसिडीटी ने त्रस्त आहात पहा👉 घरघुती उपाय आणि योगासने
पगार खाते
मित्रांनो "पगार खाते" संबधीत माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.
सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
0 Comments