सोयाबीन सर्वोत्तम वाण | Soyabean top variety

 सोयाबीन वाण (soybean variety) देशातील खरिप हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणजे सोयबीन.मागील दोन वर्षांमध्ये सोयबीन ला विक्रमी भाव मिळाले तसेच इतर पिकांच्या तुलनेत मेहनत आणि खर्च खुप कमी लागत असल्याने महाराष्ट्रामध्ये शेतकरी सोयबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे.आज आपण सोयबीन च्या विभागानुसार प्रगत आणि सर्वोत्तम वाण कोणते याविषयी माहिती पाहणार आहोत.


Soyabean variety
Soyabean variety


सोयाबीन सर्वोकृष्ट वाण


 'सोयाबीन सर्वोकृष्ट वाण' खालील प्रमाणे आहेत.
 
KDS 228 (फूले कल्याणी)

👉 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीने विकसित केलेले वाण
👉 प्रसारीत वर्ष :- 2005.
👉 कालावधी : -  95 -100 दिवस.
👉 उत्पादन :- 23-24 (क्विंटल/हेक्टर)
👉 पीक परिपक्व झाल्यानंतर 15-18 दिवस शेंगा फूटत नाहीत.
👉 रोगस व किडीस प्रतीकारक वाण.
👉 JS 335 पेक्षा 20% अधिक उत्पादन.
👉 तेलाचे प्रमाण 20.3% तर प्रथिने 41.6% आहे.
👉 महाराष्ट्र व उत्तर पूर्व भागात शिफारस.

KDS 344  (फुले अग्रणी)

>> महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीने विकसित केलेले वाण
>> प्रसारीत वर्ष - 2013-2014
>> जमीन - बागायती / कोरडवाहू
>> कालावधी: -  95 -100 दिवस.
>> उत्पादन - 30-32 ( क्विंटल/ हेक्टर)
>> तांबेरा रोगास प्रतीकारक वाण.

KDS 726 (फुले संगम)

👉 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीने विकसित केलेले वाण
👉 प्रसारित वर्ष 2016
👉 कालावधी 100-105
👉 जमीन - बागायती / कोरडवाहू
👉 उत्पादन - 23 ते 35 (क्विंटल/ हेक्टर)
👉 तांबेरा रोगास प्रतिबंधक.
👉फुले संगम ( KDS 726 ) सोयाबीनच्या दान्यावर जांभळे टिपके रोग प्रतिबंधक असते.
👉 माशी प्रभाव फुले संगम वर कमी जाणवत असतो.
👉 पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ मराठवाडा,साठी शिफारस

DSB 21

👉 DSB 21 प्रसारीत वर्ष - 2013.
👉 कालावधी  -  95 -100 दिवस.
👉 उत्पादन  - 30-35(क्विंटल/ हेक्टर)
👉 तांबेरा रोगास प्रतीकारक वाण.


MAUS 71 (समृध्दी)

>> मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीने विकसित केलेले वाण
>> प्रसारीत वर्ष - 2002.
>> कालावधी :-  93 -99 दिवस.
>> उत्पादन  :- 28-30(क्विंटल/हेक्टर)
>> पीक परिपक्व झाल्यानंतर 12-15 दिवस शेंगा फूटत नाहीत.
>> रोगस व किडीस प्रतीकारक वाण.
>> JS 335 पेक्षा 15% अधिक उत्पादन.
>> तेलाचे प्रमाण 20.3% तर प्रथिने 41.6% आहे.
>> महाराष्ट्र व उत्तर पूर्व भागात शिफारस.

हेही पहा 👉कापसाचे सर्वोत्तम वाण 2023

MAUS 158

>> मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीने विकसित केलेले वाण
>> MAUS 158 प्रसारीत वर्ष - 2009
>> कालावधी :-  93 -98 दिवस
>> उत्पादन :- 26-31 (क्विंटल/हेक्टर)
>> पीक परिपक्व झाल्यानंतर 12-15 दिवस शेंगा फूटत नाहीत.
>> खोडमाशीसाठी प्रतीकारक वाण.
>> JS 335 व एम.ए.यू.एस.71 पेक्षा 10-15% अधिक उत्पादन.
>> तेलाचे प्रमाण 20.6% तर प्रथिने 42.4% आहे.
>> मराठवाड्यासाठी शिफारस

MAUS 162

>> मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीने विकसित केलेले वाण
>> MAUS 162 प्रसारीत वर्ष - 2012.
>> कालावधी : -  100-103 दिवस.
>> उत्पादन :- 25-30(क्विंटल/ हेक्टर)
>> पीक परिपक्व झाल्यानंतर 15 दिवस शेंगा फूटत नाहीत.
>> रोग व किडीस प्रतीकारक वाण.
>> यंत्राने काडनीस योग्य वाण.
>> JS 335 व MAUS.71 पेक्षा 10-15% अधिक उत्पादन.
>> तेलाचे प्रमाण 21.37% तर प्रथिने 41.15% आहे.

JS 385

>> JS 385 प्रसारित वर्षे  1993
>> जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठने विकसित केलेले वाण
>> कालावधी - 95 ते 110 दिवस
>> जमीन - काळी/ भारी
>> उत्पादन - 22 ते 24 (क्विंटल/ हेक्टर)
>> प्रोटिन्स- 40 ते 41%, तेल - 17 ते 19
>> शिफारस - महाराष्ट्र,गुजरात, मध्य प्रदेश,छत्तीसगड

सोयाबीन वाण (soybean variety) 

    

   या सर्व 'सोयाबीन वाण(soyabean variety)' संदर्भात आपणास सर्वसाधारण कल्पना यावी यासाठी वर निर्देशित वाणांची माहिती दिली आहे तरी पण आपल्या स्थानिक कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे आपल्या संबंधित भागाकरिता शिफारशीत वाणाचाच प्रत्यक्ष तज्ञाचा सल्ला घेऊनच लागवड करावी.

      नवीन सोयाबीन वाण प्रसारित करताना शास्त्रज्ञ अनेक चांगले गुणधर्म घेऊन नवीन वाण प्रसारित करतात परंतु स्थानिक हवामान व इतर पिकाच्या उत्पादनावर परिणाम करणारे अनेक घटक हे पिकाच्या उत्पादकतेस कारणीभूत ठरत असतात त्यामुळे केवळ नवीन वाण पेरले हमखास उत्पादन वाढते हा समज दूर करावा.आपल्या परिसरात पोषक वाणांची माहिती शेतकरी बांधवास असल्यास त्याचा सुद्धा वापर करावा.

   शेती संबंधित अद्ययावत माहिती पाहण्यासाठी आमच्या WhatsApp गृपमध्ये ॲड होण्यासाठी खाली क्लिक करा. 👇


WhatsApp group
WhatsApp group

  मित्रांनो वरील माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.

  सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

Post a Comment

0 Comments