संकलित मूल्यमापन दिनांक १६ जून, २०१० च्या शासन निर्णयान्वये इयत्ता पाहली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे.
संकलित मूल्यमापन |
संकलित मूल्यमापन (Summative Evaluation)
संकलित मूल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी,प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश करावा.संकलित मूल्यमापन प्रथम व द्वितीय सत्राच्या अखेरीस लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक स्वरुपात करण्यात यावे. लेखी स्वरुपातील साधनांमध्ये मुक्तात्तरी प्रश्नांचा (open ended questions) अधिक वापर करण्यात यावा. संविधानातील मूल्ये, गाभाघटक. जीवन कोशल्ये व दूरगामी उद्दिष्टे या संदर्भातील मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने विचार करण्यात यावा.'संकलित मूल्यमापन (Summative Evaluation)'
संकलित मूल्यमापनाचे स्वरूप
१) पहिले संकलित मूल्यमापन प्रथम सत्राच्या अखेरीस व दुसरे संकलित मूल्यमापन द्वितीय सत्राच्या अखेरीस तोंडी प्रात्यक्षिक वर्ग स्तरावर शाळा स्तरावर शिक्षक व मुख्याध्यापक यांनी ठरवून करावे.
२) संपूर्ण शिक्षण प्रक्रियाच आनंददायी असणे आवश्यक आहे. विद्याथ्यांला आपली मते मुक्तपणे व सहजतेने देता येतील/व्यक्त करता येतील अशा रीतीने मूल्यमापन करावे. मूल्यमापनामुळे मुलांना भीती. दडपण वाटणार नाही याची दक्षता घ्यावी.
३) प्रत्येक शिक्षकांनी मूल्यमापन करण्यासाठी विषयांची उद्दिष्टे पहावीत व त्यानुसार मूल्यमापनाची कार्यपध्दती ठरवावी.
४) विहित विषयाचे ज्ञान आकलन, उपयोजन, काशल्ये, अभिरुची अभिवृत्ती, रसग्रहण इत्यादी उद्दिष्टांचे मूल्यमापन करण्यापूर्वी त्या विषयीचा वर्गात आवश्यक तो पुरेसा सराय घ्यावा.
५) संकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करताना सर्व उद्दिष्टांना योग्य प्रमाणात भारांश द्यावा. तसेच वस्तुनिष्ठ लघुत्तरी व दीपोत्तरी प्रश्नांसाठी इयत्तानिहाय योग्य प्रमाणात भारांश निश्चित करावा. इयत्ता पहिली दुसरी व इयत्ता तिसरी चौथीसाठी वस्तुनिष्ठ व लघुत्तरी प्रश्न अधिक असावेत. इयत्ता पाचवी ते आठवांसाठी वस्तुनिष्ठ लघुत्तरी व दीघोत्तरी प्रश्नांसाठी अनुक्रमे सर्वसाधारणपणे २०%, ६०% व २०% भारांश असावा.
संकलित मूल्यमापन प्रथम सत्र प्रश्न पत्रिका
संकलित मूल्यमापन प्रथम सत्र पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील इयत्तेवर क्लिक करा.
संकलित मूल्यमापन प्रथम सत्र प्रश्न पत्रिका
संकलित मूल्यमापन प्रथम सत्र प्रश्न पत्रिका
संकलित मूल्यमापन प्रथम सत्र प्रश्न पत्रिका
संकलित मूल्यमापन प्रथम सत्र प्रश्न पत्रिका
संकलित मूल्यमापन प्रथम सत्र प्रश्न पत्रिका
संकलित मूल्यमापन
0 Comments