आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1- इयत्ता पहिली ते सातवी | aakarik chachani

 आकारिक मूल्यमापन चाचणी सन २०१०-२०११ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीसाठी पुढीलप्रमाणे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे.विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगाने मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळास्तरावरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन होय.


आकारिक चाचणी 1
आकारिक चाचणी 1


आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation)


 सर्व शिक्षकांनी खालील साधन-तंत्र उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवाव्यात अशी तरतूद करण्यात आली आहे.'आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation)'

आकारिक मूल्यमापन तंत्र

१) दैनंदिन निरीक्षण

२) तोंडी काम (प्रश्नोत्तर प्रकट वाचन, भाषण-संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत. गटचर्चा इत्यादी )

३) प्रात्यक्षिके / प्रयोग.

४) उपक्रम / कृती (वैयक्तिक, गटात, स्वयं अध्ययनाद्वारे)

५) प्रकल्प

६) चाचणी (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारीक स्वरुपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह चाचणी / open book test)

७) स्वाध्याय / वर्गकार्य (माहिती लेखन, वर्णन लेखन, निबंध लेखन अहवाल लेखन, कथा

लेखन पत्र लेखन, संवाद लेखन व कल्पना विस्तार इत्यादी) ८) इतर प्रश्नावली. सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य

मूल्यमापन साधने

आकारिक मूल्यमापनात वरील मूल्यमापनाची साधन-तंत्र यापैकी इयत्ता विषय आणि उद्दिष्टे विचारात घेऊन अधिकाधिक साधन-तंत्रांचा वापर करावा. यात किमान पाच साधनं तंत्र यांचा वापर करावा. कला कार्यानुभव शारिरीक शिक्षण व आरोग्य या विषयांसाठी किमान तीन साधने-तंत्रे यांचा वापर करावा. प्रत्येक साधन-तंत्रास योग्य भारांश द्यावा. तसेच विद्यार्थी वर्षभरात किमान एक प्रकल्प करतील असे पहावे. प्रत्येक सत्रात किमान एक छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह लेखी बाचणी (Open book test) घ्यावी. विद्यार्थी, विषय आणि उद्दिष्टे इत्यादीनुसार उपरोक्त साधन तंत्राच्या उपयोगाबाबत आकारिक मूल्यमापनात लवचिकता राहील.


आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक - 1


आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक - 1  प्रश्न पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी इयत्तेवर क्लिक करा


आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक -1 प्रश्न पत्रिका 

👉 इयत्ता पहिली

आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक -1 प्रश्न पत्रिका  

👉 इयत्ता दुसरी

आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक -1 प्रश्न पत्रिका 

👉 इयत्ता तिसरी

आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक -1 प्रश्न पत्रिका 

👉 इयत्ता चौथी

आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक -1 प्रश्न पत्रिका 

👉 इयत्ता पाचवी


आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक -1 प्रश्न पत्रिका 

👉 इयत्ता सहावी

आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक -1 प्रश्न पत्रिका 

👉 इयत्ता आठवी





आकारिक मूल्यमापन चाचणी


मित्रांनो 'आकारिक मूल्यमापन चाचणी' माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.  

  सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

Post a Comment

0 Comments