Naagin Disease : नागीण हे नाव एकल्यावरच अंगाचा थरकाप उठतो.या आजाराविषयी समज कमी तर गैर समज जास्त आहे. नागिणीने विळखा मारला की जीवाला धोका असतो.खरे तर योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करता येतो. त्यासाठी योग्य वेळेस औषधोपचार करायला हवे. नागिणीचा आजार कशा मुळे होतो, त्याची लक्षणे, आणि त्यासाठीचे काय औषधोपचार आहे आणि काय काळजी घ्यावयाची असते हे जाणून घेऊ.
![]() |
Nagin disease |
नागीण आजार माहिती (Herpes Zoster in Marathi)
नागीण हा आजार कांजिण्यांच्या विषाणूंमुळे होतो. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू लपून राहतात. अनेक वर्षांनी विषाणू चेतारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर फोड निर्माण करतात. नागिणीची तीव्रता वयाबरोबर वाढते. उतार वयात नागीणीचा जास्त त्रास होतो.नागीण आजार माहिती (Herpes Zoster in Marathi)
हे विषाणू चेतातंतूच्या रेषेवर वाढतात. सुरुवातीस त्या चेतातंतूंच्या मार्गावर खूप दुखते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो. पाठोपाठ पाण्याने भरलेले दुसरे फोड येतात. हे फोड छोटे छोटे व एकत्र पुंजक्यामध्ये येतात. पाच ते सहा दिवसांत वर खपली धरून वाळू लागतात. फोड गेले की दुखणे बहुधा थांबते.
नागीण आजार कारणे (Causes of Nagin aajar)
Naagin Disease आजार का डोके वर का काढतो,याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.असे मानले जाते की, जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रितकारक शक्ती कमी होते तेव्हा हा वायरस नर्वस सिस्टीममधून बाहेर येऊन सक्रिय होतो आणि आपल्या त्वचेपर्यंत पोहोचतो. वाढत्या वयासोबत याचा धोकाही अधिक वाढतो.
हे पण पहा 👉ॲसिडीटी ने त्रस्त आहात पहा घरघुती उपाय आणि योगासने
नागीण आजार पूर्ण शरीरावर कुठेही होतो. जास्तकरून चेहरा छाती पोट व हात या अवयवांवर हा आढळतो. शरीरात कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती व पित्ताची वाढती मात्रा यांचे प्रतिक म्हणजेच नागीण होय. सततची जागरणे, पित्त वाढवणारा आहार,जेवणाच्या अनियमित वेळा,या सगळ्यांमुळे शरीरातलं पित्त वाढून नागिण होते.
नागीण आजार झाल्यावर व्यक्तीच्या शरीरावर लाल पुरळ येते. त्यामुळे त्याला वेदना सुरु होतात. पुरळींमध्ये वेदना होणे या आजाराचं सर्वात प्रमुख कारण आहे. हा आजार झाल्यास डोकेदुखी, सांधेदुखी, थकवा आणि ताप इत्यादीही समस्या होतात."नागीण आजार कारणे (Causes of Nagin aajar)"
जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी toch करा 👇
![]() |
What's Aap |
नागीण आजार लक्षणे (Herpes Disease Symptoms)
>> रुग्णाला त्वचेची जळजळ आणि खाज सुटणे आहे.
>> नागीण संसर्गामुळे लिम्फ नोड्स सूज येते.
>> नागीण संसर्गामुळे बर्याच वेळा ताप देखील येतो.
>> चेहऱ्यावर पाण्याने भरलेल्या लाल पुरळ आहेत.
>> नागीण संसर्गामुळे सांधे दुखी वाढते.
नागीण आजारावर घरगुती उपाय (Naagin Disease Home Remedies In Marathi)
1)नागीण आजारावर मात करण्यासाठी शारीरिक दाह कमी करण्यासाठी कॅमोमाईल आणि स्टार्च हे तेल वापरून दाह कमी करू शकतात.
हे पण पहा 👉 मंकीपॉक्स व्हायरस म्हणजे काय ? जाणून घ्या आजाराची लक्षणे,कारणे आणि उपाय
2)नागीण रोगावर आराम मिळवायचा असेल तर नियमित थंड पाण्याची आंघोळ करणे गरजेचं
3) नागीण आजारावर मात करण्यासाठी सकस योग्य समतोल आहार खाण्याचे योग्य नियोजन आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे.
4) नागीण रोगावर लवकरच मात करण्यासाठी योग्य सकस आहारात जीवनसत्व घेणे गरजेचं आहे. तसेच योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स सप्लिमेंट घेणे गरजेचं आहे.
5)नागीण आजारावर एक उपाय म्हणजेचं आपली स्वतःची प्रतिकार शक्ती वाढविणे अतिशय गरजेचं आहे.
6) नागीण आजाराने त्रस्त असताल तर औषधांचे योग्य सेवन करणे गरजेचे आहे.'नागीण आजारावर घरगुती उपाय (Naagin Disease Home Remedies In Marathi)'
हे पण पहा 👉 बापरे...‘बाबा वेंगा’ यांनी 2022 सालाबाबत केलेल्या या भविष्यवाण्या वाचून घाम फुटेल
0 Comments