Personal Loan 2022 कोरोनाच्या काळात (Covid-19) लोकांच्या आरोग्याबरोबरच खिशावरही वाईट परिणाम झाला आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली असून अनेक अडचणींच्या प्रसंगी कर्ज घेण्याची वेळ आली आहे.यामुळे सध्याच्या काळात वैयक्तिक कर्जाची (Personal Loan) मागणी खूप वाढली असून,लोक स्वस्त वैयक्तिक कर्जाचा शोध घेत आहेत.

Personal loan
Personal loan


     आर्थिक संकटकाळी वैयक्तिक कर्ज हा चांगला पर्याय मानला जातो.गावठी व्याजाने कर्ज घेण्यापेक्षा तुमचे खाते असलेल्या बँकेतून वैयक्तिक कर्ज घेणे कधीही चांगले असते.हे कर्जही त्वरित उपलब्ध होते आणि कागदपत्रे कमी लागतात. Personal Loan वरील व्याजदर सामान्यतः 9.55 % ते 21% पर्यंत असतो.वैयक्तिक कर्जाचा व्याजदर दर तुमची बँक,कर्जाचा प्रकार, क्रेडिट स्कोअर,विद्यमान कर्ज,उत्पन्न आणि कर्जाची रक्कम यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो.

Personal Loan

  कर्ज घेण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक आहे.सर्व बँकांना समान व्याजदर नाही.बँकांचे व्याजदर कमी किंवा जास्त असू शकतात.तुम्हाला स्वस्त कर्ज मिळेल,यासाठी खालील बँकांची यादी पाहा आणि त्यांच्या व्याजदराची तुलना करा आणि कमी व्याजदर आकारणाऱ्या बँकेकडून कर्ज घ्या.आज आपण काही बँकांबद्दल जाणून घेऊया जे स्वस्तात 'Personal loan' देतात.

Personal loan bank list

State Bank of India

      स्वस्त कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँकांच्या यादीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) नाव अग्रस्थानी आहे.SBI बॅंकेकडे 9.60 ते 13.60 टक्के दरानं Personal loan उपलब्ध आहे.स्टेट बँक 20 इंडिया लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज देते.

Axis Bank

    ॲक्सिस बँकेच्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर 10.25 ते 21 टक्क्यांपर्यंत आहे. कर्जाच्या रकमेच्या 1.5% ते 2℅ पर्यंत प्रक्रिया शुल्क म्हणून भरावे लागेल.कर्जाची पूर्व-भरपाई देखील वेळेपूर्वी केली जाऊ शकते.कर्ज घेतल्यानंतर 1 ते 12 महिन्यांच्या आत पैसे परत केले,तर 5 टक्के दंड भरावा लागेल.13 ते 24 महिन्यांसाठी 4%, 25 ते 36 महिन्यांसाठी 3% आणि जर तुम्ही 37 महिन्यांनंतर कर्जाची मुदतपूर्व फेड केली तर कर्जाच्या रकमेच्या 2% दंड आणि GST भरावी लागते.

Bajaj Finserv

बजाज फिनसर्व Personal loan सुविधा देखील देते. येथे व्याज 11% पासून ते 16 % पर्यंत सुरू होते. कर्जाच्या 3% रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून भरावी लागेल. कर्ज घेतल्याच्या 1 महिन्यानंतर आंशिक प्रीपेमेंट करता येते. प्रीपेमेंटसाठी, तुम्हाला किमान 1 ईएमआयच्या रकमेपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. 

Bank of Baroda

बँक ऑफ बडोदा 10 लाख रुपये पर्यंत वैयक्तिक कर्ज देते.ऑफ बडोदाचा व्याजदर 10 टक्क्यांपासून ते 15.60 % पर्यंत आहे. कर्जाच्या रकमेपैकी 2% रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून भरावी लागते.कर्ज करारात निश्चित केलेल्या अटींनुसार, मुदतपूर्व पैसे परत केले जाऊ शकतात.

Bank of Maharashtra

  बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपये पर्यंत वैयक्तिक कर्ज देते. बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज व्याजदर 9.55 टक्क्यांपासून तर 10.55% पर्यंत आहे.कर्जाच्या रकमेपैकी 1% प्रक्रिया शुल्क भरावे लागतो.कर्जाच्या करारानुसार तुम्ही कर्जाची रक्कम मुदतपूर्व भरू शकता.

City Bank

 सिटी बँक वैयक्तिक कर्ज 9.99% पासून सुरू होते आणि कर्जाच्या रकमेच्या 3% प्रक्रिया शुल्क म्हणून भरावे लागतात. कर्ज घेतल्यानंतर 12 महिन्यांनंतरच प्रीपेमेंट करता येते. प्रीपेमेंटची रक्कम 2 EMI इतकी कमी आणि जास्तीत जास्त 5 EMI असू शकते.

HDFC Bank

HDFC बँकेत 50 हजार ते 40 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक उपलब्ध आहे.एचडीएफसी बँकेचे 10.25% ते 17 टक्क्यांपर्यंतच्या व्याजदरसह कर्जाच्या रकमेच्या 2.5 टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून भरावी लागते.12 emi भरल्यानंतर तुम्ही कर्जाची प्रीपे करू शकता.तुम्ही उर्वरित मुद्दलाच्या 25% मुदतपूर्व भरू शकता. Personal loan bank list

ICICI Bank

ICIC बॅंक 40 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज देते.आयसीआयसीआय बँकेचे वैयक्तिक कर्जाचे व्याजदर 10.50 टक्क्यांपासून सुरू होते. कर्जाच्या रकमेच्या 2.5 टक्के पर्यंत प्रक्रिया शुल्क म्हणून भरावे लागेल.ही बँक कर्जाच्या मुदतपूर्व फेडीची सुविधा देत नाही.


हेही पहा👉 पगार खात्याचे (Salary Account) फायदे


Personal loan document list


पगारदारांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी :-

•ओळखपत्र:- पासपोर्ट/ड्रायव्हींग लायसेन्स/मतदानपत्र/पॅन कार्ड (कोणतेही एक)

•रहिवासी प्रमाणपत्र:-लिव्ह ऍन्ड लायसेन्स करार/युटीलिटी बील (3 महिन्यांपेक्षा जुनी नसावी)/पासपोर्ट 

•मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट (जेथे वेतन जमा होते).

•मागील 3 महिन्यांचे पगारपत्रक

•2 पासपोर्ट साईझ फोटो

•इनकम टॅक्स 

•इतर कर्ज असल्यास त्याचे बॅंक स्टेटमेंट

वैयक्तिक कर्ज

वैयक्तिक कर्ज मागणी करत असलेल्या स्वयंरोजगारांसाठी

आवश्यक कागदपत्र यादी:-

•केवायसी कागदपत्रे: ओळखपत्र- आधार कार्ड, पॅन कार्ड

•जन्मतारखेचा दाखला.

•रहिवासी दाखला:- -लिव्ह ऍन्ड लायसेन्स करार/युटीलिटी बील (3 महिन्यांपेक्षा जुनी नसावी)/पासपोर्ट (कोणतेही एक)

•उत्पन्नाचा दाखला (मागील दोन वर्षांचे लेखापरीक्षित आर्थिक  व्यवहार).

•मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.

•एक रहिवासी दाखला.

•रहिवासी किंवा ऑफिस मालक असल्याचा दाखला.

•व्यवसाय चालू असल्याचा दाखला.

•इतर कर्ज असल्यास त्याचे बॅंक स्टेटमेंट

प्रत्येक बँकेचे व अटी लागू , तसेच बँक Personal loan document list अतिरिक्त मागविण्याचा हक्क राखून ठेवते. 


50 हजार रुपये मुद्रा लोन विषयीच्या सगळ्या माहिती साठी
                          👉 Click here👈


पर्सनल लोन

मित्रांनो "पर्सनल लोन" संबधी माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.

       सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 

Disclaimer : तुमच्या जबाबदारीवर किंवा योग्य माहिती घेऊन  Instant Loan किंवा personal loan साठी अर्ज करा, आमचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही. आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे, कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक, महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.