SBI E-Mudra Loan भारतातील असंख्य बेरोजगार,होतकरू युवक,युवतींसाठी केन्द्र सरकारने महत्वकांक्षी पंतप्रधान मुद्रा लोन योजना सुरू केली होती.त्यानूसार अनेकांनी या योजनेचा लाभ घेत कर्ज घेतले आहे. त्यासाठी ग्राहकांना आतापर्यंत बॅंकेत अर्ज करावा लागत असे.कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सहज लोन मिळत असे.आज आपण पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेचे स्वरूप,निकष व अर्ज करण्याची पद्धत याची सगळी माहिती या लेखात पाहणार आहोत.
Mudra Loan |
SBI E Mudra Loan
आनंदाची गोष्ट म्हणजे देशातील अग्रगण्य बॅंक SBI ने आपल्या खातेधारकांसाठी 'SBI E Mudra Loan' योजनेअंतर्गत SBI e-Mudra Loan सुविधा सुरू करून दिली आहे.ज्यांना सूक्ष्म उद्योग सुरू करण्यास इच्छा आहे,ते या योजनेंतर्गत, 50 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात.या कर्जाची परतफेड करण्यासाठी 60 महिन्यांची मुदत दिलली जाईल. कर्जाची परतफेड 9 % व्याज दरासह 3 महिन्यांच्या स्थगित कालावधीनंतर सुरू होईल.
मुद्रा कर्ज (PMMY) योजना
मुद्रा कर्ज योजना काय आहे ?
मुद्रा कर्ज (PMMY) योजना हा प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा ( PMML) एक भाग आहे. या योजनेची सुरवात 8 एप्रिल 2015 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी केली.या योजनेंतर्गत कृषी क्षेत्रासह उत्पादन, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील सूक्ष्म उद्योग/युनिट्सना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
ज्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खातेधारकांना मायक्रो एंटरप्रायझेस (MSME) वैयक्तिक सुरू करायचे आहे त्यांना ई- मुद्रा कर्ज दिले जाईल.अनेक लोक ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण ते पैशाअभावी करू शकत नाहीत.या लोकांसाठी हि योजना फायद्याची ठरणार आहे
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना पात्रता व निकष
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना पात्रता व निकष खालील प्रमाणे आहेत.
1)व्यक्ती भारताची रहिवासी असावी आणि तिचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
2) मोबाइल क्रमांक लिंक असलेले आधार बँकेशी जोडला गेलेले पाहिजे.
3) बचत / चालू खाते सांभाळणारे विद्यमान वैयक्तिक ग्राहक ई- मुद्रा डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी अर्ज करू शकतात.
4) यापूर्वी कोणतेही SME कर्ज घेतलेले नसावे.
5) अर्जदाराने शिशूसाठी मुद्रा स्कोअरिंग कार्डमध्ये किमान 50 % गुण प्राप्त केलेले असावेत.
हेही पहा 👉 कोणती बॅंक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज
SBI E-Mudra Loan Online Registration
SBI ई -मुद्रा कर्ज ऑनलाइन अर्ज / नोंदणी
1. सर्वप्रथम तुम्हाला SBI च्या https://www.sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
2. इथे क्लिक केल्यावर त्याचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल. ई- मुद्रा टॅब कर क्लिक करून ओपन करा.
3. त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. नंतर OTP जनरेट करा.
4. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक OTP प्राप्त होईल दिलेल्या जागेत OTP टाका आणि Submit बटनावर क्लिक करा.यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
5) या पेजवर तुम्हाला तुमचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा खाते क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतर कर्जाची रक्कम टाकावी लागेल. (जर तुम्हाला कर्जाची कमाल रक्कम पन्नास हजार रुपये ऑफय असेल तर,तुम्ही यापेक्षा जास्त रक्कम टाकू शकणार नाही) त्यानंतर Proceed वर क्लिक करा.
6. नंतरच्या पेजवर,तुम्ही तुमचा वैयक्तिक तपशील (पॅन क्रमांक,शैक्षणिक पात्रता, घराची मालकी, मासिक उत्पन्न, आश्रित कुटुंबातील सदस्यांचे तपशील,सामाजिक श्रेणी, अल्पसंख्याक समुदाय इ) भरा आणि पुन्हा Proceed वर क्लिक करा.
7. पुढील पानावर तुम्ही भरलेली सर्व माहिती तुम्हाला दाखवली जाईल.सर्व माहितीची पून्हा एकदा बरोबर असल्याची खात्री करा.
8. माहिती बरोबर असल्यास, Term and conditions तपासा आणि चिन्हावर पुढे जा वर क्लिक करा.
9. आपला अर्ज save होईल त्यानंतर तूम्ही भरलेला SBI Mudra Loan अर्जाची PDF डाउनलोड करा.
10. यानंतर आता पुढील पानावर आधार e-kyc ई साइन केले जाईल.
11.आता तुमच्या फोनवर OTP येईल, तुम्हाला OTP टाकून eSign करावे लागेल. हे योग्यरित्या केले असल्यास, तुम्हाला पुढील पृष्ठावर पुष्टीकरण दिसेल,त्यानंतर पुढे जा वर क्लिक करा.
12.शेवटी,एका नवीन पृष्ठावर तुम्हाला सांगितले जाईल की तुमचा एसबीआय ई- मुद्रा कर्ज अर्ज स्वीकारण्यात आला आहे. त्याची प्रिंट अवश्य घ्या.
हेही पहा 👉असी घ्या आपल्या CIBIL Score ची काळजी
(State Bank of India E-Mudra Loan योजनेची सर्व माहिती आणि सामग्री स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून अपडेट केली आहे)
SBI E-Mudra Loan
Online Registration
करण्यासाठी येथे
क्लिक करा
👇
👉 मुद्रा लोन योजना 👈
Pradhanmantri Mudra Yojana
मित्रांनो "Pradhanmantri Mudra Yojana" संबधी माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.
सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
SBI Bank या बँकेत खाते
असेल तर मिळणार 2 लाख रुपये,
पहा तात्काळ आपले नाव
👇
👉 येथे क्लिक करा 👈
0 Comments