LIC Credit Card | एल.आय.सी.क्रेडिट कार्ड काय आहेत फायदे?

 LIC Credit Card ची सुविधा सध्या फक्त LIC पॉलिसीधारक आणि एजंटसाठी सुरू करण्यात आली आहे,परंतु त्याच्या यशानंतर,लवकरच सामान्य नागरिकांसाठी ते जारी करण्याची तयारी एल.आय.सी.कडून चालू आहे.

    

LIC Credit Card
LIC Credit Card

LIC Credit Cards

भारतातील असंख्य लोक एल.आय.सीच्या विविध जीवन विमा पॉलिसींचा लाभ घेत आहेत.पण, तुम्हाला माहिती आहे का की भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) त्यांच्या पॉलिसीधारक आणि पॉलिसी सल्लागारासाठी खास 'LIC Credit Cards' सुविधा आणली आहे.आपण जर एल.आय.सीच्या कोणत्याही पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली असेल,आणि तुमचे वय 18 ते 70 वर्षे दरम्यान असल्यास तुम्ही या सुविधेचा सहज फायदा घेऊ शकता.एल.आय.सीने या क्रेडिट कार्डसाठी Axis/IDBI बँकेशी करार केलेला आहे.LIC सध्या त्यांच्या पॉलिसी धारकांना Lumine Credit Card आणि Eclat Credit Card सुविधा पुरवत आहे.

एल.आय.सी.क्रेडिट कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे

Documents For LIC Credit Card

   एल.आय.सी क्रेडिट कार्डसाठी खालील कागदपत्रे Documents For LIC Credit Card आवश्यक आहेत. 

👉पॅन कार्ड, 

👉आधार कार्ड, 

👉पासपोर्ट आकाराचा फोटो, 

👉तीन महिन्याचे पगारपत्रक

👉बँक स्टेटमेंट( मागील 6 महिने) 

👉आयकर रिटर्नची प्रत, 

👉पासपोर्ट,ड्राईव्हिंग लायसन्स,व्होटर आयडी (यापैकी कोणतीही एक)

WhatsAap


LIC Credit Card चे फायदे 

Benefits of LIC Credit Card


>> LIC Credit Card तुम्ही पेट्रोल पंपावर वापरल्यास तुम्हाला 1 टक्के फ्युअल सरचार्ज मिळेल.परंतु 400 ते 4000 रुपयापर्यंतच्या व्यवहारासाठीच याचा लाभ मिळेल.

>> 25 हजारांपेक्षा अधिकच्या खरेदीवर तुम्ही हवे असल्यास त्याचे EMI मध्ये रूपांतर करू शकता.अत्यंत कमी व्याजदरात त्याची परतफेड करता येऊ शकते.यासाठी तुम्हाला खरेदी केल्यानंतर 20 दिवसांच्या आत अर्ज करावा लागतो.

>> एका क्रेडिट कार्डचे, आपण आपल्या कुटुंबातील पती, पत्नी,आई,वडील,सासू,सासरे,भाऊ,बहीण आणि मुलांसाठी असे जास्तीत जास्त 3 ॲड-ऑन कार्ड बनवू शकतो.

>> LIC Credit Card धारकाला 3 लाखांपर्यंतचे वैयक्तिक  आरोग्य विमा संरक्षण आणि एक कोटी रुपयांचा विमान अपघाती विमा देखील मिळतो.

>> जर तुम्हाला इतर बँकेच्या क्रेडिट कार्डची रक्कम पेड करायची असेल तर या कार्डमध्ये तुम्हाला बॅलन्स ट्रान्सफर करण्याची सुविधाही मिळते.Benefits of LIC Credit Card


हे पण पहा👉 पगार खात्याचे (Salary Account) फायदे


एल.आय.सी कार्ड बील पेमेंट कसे करावे? 

How to pay bill of LIC Credit Card? 

How to pay bill of LIC Credit Card?

बिलडेस्कद्वारे तुमच्या संबंधित बँकांच्या नेटबेकिंग सुविधेचा वापर करून तुमच्या क्रेडिट कार्डची बिले भरू शकता.अधिक जाणून घेण्यासाठी liccards.co.in च्या ऑनलाइन पेमेंट पर्यायाला भेट द्या. 

ऑफलाइन पर्याय (Ofline) 

चेक/ड्राफ्ट (check/D.D) 

तुम्हाला द्यायची असलेली रक्कम निवडा आणि फक्त 'एलआयसी क्रेडिट कार्ड नंबर (१६ अंकी क्रेडिट कार्ड नंबर)' च्या नावे चेक/ड्राफ्ट काढा. तुम्ही कोणत्याही MINC बिल बॉक्समध्ये चेक देखील टाकू शकता.

चेकद्वारे बील पेड करताना ही काळजी घ्या:- 

● देय तारखेच्या किमान ४ दिवस आधी चेक टाकावा. 

● चेक राष्ट्रीय बँकेतील असावा. 

● चेकवर दिनांक,स्वाक्षरी बरोबर असावी. 


हेही पहा 👉कोणती बॅंक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज


रोख पेमेंट (Cash Payment) 

तुमचे LIC क्रेडिट कार्ड बिल रोखीने पेमेंट करण्यासाठी तुमच्या जवळच्या ॲक्सिस/ IDBI बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता. 


एलआयसी क्रेडिट कार्ड

  मित्रांनो "एलआयसी क्रेडिट कार्ड" विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली तर नक्कीच शेअर करा.

      सदरील लेखा मधील  कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 

Post a Comment

0 Comments