खतांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ | Fertilizer price hike in Maharashtra

     Fertilizer Price hike हंगाम कोणताही असो खत टंचाई ही ठरलेलीच असते.यंदा तर यावर्षीच्या रब्बी हंगामाच्या सुरवातीपासूनच खतासाठी ओरड सुरु झाली आहे. मागणीच्या तुलनेत होत असलेला पुरवठा हा अत्यल्प असल्यामुळे सरकारही हतबल झालेले दिसत आहे.

Fertilizer price hike
Fertilizer price hike


खतांच्या दरात किती वाढ झाली ?

Why hike price of fertilizer? 

'खतांच्या दरात किती वाढ झाली ?' प्रति 50 किलो बॅगचे खत निहाय दर आणि झालेली वाढ खालील प्रमाणे :

👉10:26:26 या खताची 1470 रुपयांना मिळणारी बॅग आता     1640 रुपयांना मिळत आहे.(वाढ - 170 /-रुपये) 

👉12:32:16 या खताच्या एका बॅगचे दर 1470 रुपया वरुन 1640 रुपयांवर गेली आहे.(वाढ - 170 /-रुपये)

👉16:20:0:13 या खताच्या एका बॅगचे दर 1050 वरून थेट 1350 रूपयांवर गेले आहेत.(वाढ - 300 /-रुपये)

👉15:15:15:09 या खताच्या एका बॅगचे दर 1080 वरून 1350 रूपयांवर गेले आहेत.(वाढ - 270/-रुपये)

👉अमोनियम सल्फेटच्या  खताच्या एका बॅगचे दर 875 रुपया वरुन 1000 रुपयांवर गेले आहे. (वाढ - 125 /-रुपये)

    दरम्यान,सध्या रब्बी ऊन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत.तसेच ऊस,फळबागा,भाजीपाला, गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी वाढत आहे.त्यामुळे रासायनिक खत कंपन्यांनी त्यांच्याकडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा,असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. श्री.भुसे यांनी नुकतीच केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मंडाविया यांना पत्र लिहून खत विक्री दर नियंत्रित करण्याची मागणी केली होती. 


यावर्षी खतांवर अनुदान नाही !

No Nutrient Based Subsidy for Fertilizer ! 

      

      मोदी सरकारकडून राखायनिक खतांवर Nutrient Based Subsidy या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. म्हणजे खतांमधील पोषकद्रव्यांच्या आधारावर म्हणजे त्या खतामध्ये असलेल्या नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश आणि सल्फर यानुसार ही सबसिडी दिली जाते.पण यावर्षी अजून पर्यंत खतांवर अनुदान (Nutrient Based Subsidy) अजून जाहीर करण्यात आलेली नाही.यावर्षी खतांवर अनुदान नाही !

     पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत 2021-22 च्या रब्बी हंगामातील पिकांसाठी फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी सबसिडी मंजूर करण्यात आली होती.सबसिडीचा कालावधी 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंतच निर्धारित करण्यात आलेला आहे.

2021-22 च्या रब्बी हंगामासाठी  खालील प्रमाणे अनुदान निश्चित करण्यात आले होते. 

👉नायट्रोजनसाठी प्रति किलो - 18.789 रुपये

👉फॉस्फेटसाठी प्रति किलो - 45.323 रुपये

👉पोटॅशियमसाठी प्रति किलो - 10.116 रुपये

👉सल्फरसाठी प्रति किलो - 2.374 रुपये

👉NPK 10:26:26,NPK 20:20:0:13 आणि NPK 12:32:16 या खतांसाठी प्रत्येक बॅगमागे 100 रुपये अनुदानाचा लाभ मिळतो. 

👉DAP च्या एका बॅगमागे शेतकऱ्यांना 438 रुपये इतके अनुदान मिळते.


हेही पहा 👉कोणती बॅंक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज


खतांचे दर का वाढले?

Why fertilizer price hike in Maharashtra? 


खतांचे दर का वाढले?

•कच्चा माल महागला

   खत निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि विदेशातून हा कच्चा माल आयात करावा लागतो.याची किंमत विदेशातच वाढल्याने त्याचा फटका भारतातील शेतकऱ्यांना बसणार आहे.

•खतांची प्रचंड मागणी   

    देशात दिवसेंदिवस खताचा वापर वाढत आहे.भारतामध्ये गेल्या 9 महिन्यांमध्ये 587 लाख टन खताची मागणी झाली आहे. तर प्रत्यक्ष आयात ही 203 लाख टन एवढी झाली आहे.म्हणजे 384 टन खतांचा पुरवठा कमी झाला आहे.मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने खतांच्या किंमती वाढणे साहजिक आहे.        

• खतांची आयात वाढली

  देशात DAP खताचा सर्वाधिक वापर होतो.दर वर्षी तब्बल 120 लाख टन DAP खताची मागणी असते.यापैकी 60 % गरज ही आयातीतून पूर्ण केली जाते,त्यापैकी 40% खत हे चीनमधून आयात केले जाते.युरियाचा वापरही DAP प्रमाणे वाढताना दिसत आहे. त्यामुळे 30 % गरज ही आयातीमधून भागवण्याची नामुष्की देशावर ओढावली आहे. त्याचप्रमाणे सध्या पोटॅशच्या मागणीच्या तुलनेच पुरवठा कमी असल्याने देशात पोटॅशचा मोठा तुटवडा जाणवत आहे.      

• खतांची कृत्रिम टंचाई         

    एकीकडे खताच्या दरात वाढ होत असली तरी स्थानिक पातळीवर कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने खताची विक्री होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराचा थेट फटका बसू नये म्हणून सरकारने अनुदान दिले होते.पण आता सबसिडी बंद झाल्याने युरिया वगळता इतर खतांच्या दरातील वाढ आणि टंचाईही कायमच आहे.

हेही पहा 👉कुसूम सोलर पंंप योजना सर्व माहिती

खतांच्या वाढत्या किमतीवर उपाय काय ? 

What is the solution of hike price?

खतांच्या वाढत्या किमतीवर उपाय काय ? 

•सबसिडी जाहीर करावी

  केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार यांनी सल्ला मसलत करून खतांच्या किंमती कमी करण्यासाठी दिली जाणारी सबसिडी पुन्हा सुरू करावी.

•आयातीवर अवलंबून राहणे कमी करावे

  केंद्र सरकारने खतांच्या निर्मितीसाठी आत्मनिर्भर होऊन आपल्या देशात खत तयार करण्यासाठी योग्य नियोजन करावे.जेणे करून खतांची आयात कमी होईल.परिणामी खतांच्या किंमती कमी होण्यास मदत होईल. 

•सरकारचे नियंत्रण आवश्यक 

   सरकारने खतांच्या कृत्रिम टंचाईवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.साठेबाजी रोखण्यासाठी योग्य यंत्रणा उभी करावी लागणार आहे.नाहीतर आगामी काळात खतांच्या किंमती गगनाला पोहोचतील आणि मरण शेतकर्यांचे होणार आहे. 

• एकाच प्रकारचे पीक घेणे टाळावे 

    भारतात शक्यतो जास्त मोठ्या भागात थंडीत मका,सोयाबीन, गहू आणि बार्ली हे पीक घेतले जाते. खताच्या किमती गेल्या वर्षभरात दुप्पट झाल्याने आता एकाच पिकावर अवलंबून राहणे कठीण आहे.अंतर पीक आणि रोटेशन पद्धतीने वेगवेगळी पिके घेणे गरजेचे आहे.


आणखी अद्ययावत Bajar Bhav पाहण्यासाठी आमच्या WhatsApp गृपमध्ये ॲड होण्यासाठी खाली क्लिक करा. 👇


Join whatsApp group

Fertilizer Price hike

 

 मित्रांनो "Fertilizer Price hike" विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली तर नक्कीच शेअर करा.

      सदरील लेखा मधील  कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 



Post a Comment

0 Comments