शिक्षक बदली शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यासाठी सुधारीत धोरण दिनांक 7 एप्रिल 2021 च्या आदेशानुसार राबविण्यात येणार असून सध्यस्थितीत बदल्या बाबत काय स्थिती आहे,याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
![]() |
शिक्षक बदली |
जिल्हा परिषद शिक्षक बदली
ग्रामविकास विभागामार्फत ऑनलाईन बदली सॉफ्टवेअर मध्ये सरल आणि शालार्थ मार्फत माहिती प्राप्त झाली असून सदर माहिती EXCEL SHEET मध्ये तयार केली आहे.या माहितीच्या आधारे बदली प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसाठीचे मोबाईल ॲप पूर्णपणे विकसित केले आहे.आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या पाच सीईंओंचा समावेश असलेल्या अभ्यास गटाने राज्य सरकारला ही शिफारस केली होती.या ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या बदल्यांमध्ये काही त्रुटी राहू नयेत आणि या त्रुटीच्या आधारे बदलीनंतर न्यायालयात दाखल होणाऱ्या आव्हान याचिका टाळण्यासाठी या माहितीची फेरतपासणी केली जाणार आहे.
हे पण पहा 👉 सर्व जिल्हानिहाय शिक्षक बदली 2022 याद्या पहा एका मिनिटांत
डाटा तपासणी समिती स्थापन
राज्य सरकारने या फेरतपासणीसाठी 34 जिल्हा परिषदांमधील मिळून 102 जणांची तपासणी समिती स्थापन केली आहे. या समितीत प्रत्येक जिल्हा परिषदेतून सरासरी तीन सदस्यांचा समावेश केला आहे.डाटा तपासणी समितीत प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,शिक्षण विस्तार अधिकारी, संगणक प्रोग्रॅमर, वरिष्ठ लेखनिक,डाटा एंट्री ऑपरेटर,सहायक प्रशासकीय अधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी आदी विविध पदांवरील व्यक्तींचा समावेश केला आहे.यानुसार पुणे जिल्हा परिषदेतून कनिष्ठ सहायक जीवन गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद देंडगे आणि सहायक प्रशासकीय अधिकारी शेखर गायकवाड या तिघांना या समितीत घेण्यात आले आहे.
हे पण पहा 👉 अशी भरा शिक्षक बदली पोर्टलवर माहिती
राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्यांसाठी खास ॲप विकसित केले आहे.सदरील ॲप मोबाईल आणि संगणक अशा दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन बदली आदेश मिळू शकणार आहेत.शिक्षक बदली ॲपच्या प्रगतीचा आढावा घेण्याची जबाबदारी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
हे पण पहा👉 पगार खात्याचे (Salary Account) फायदे
सरकारने तब्बल 31 मुद्द्यांच्या आधारे माहिती संकलन करण्याचा आदेश दिले होते.या आदेशानुसार या ॲपसाठीच्या मसुद्यात (डेटा) समाविष्ट करण्यात आलेली जिल्हानिहाय शिक्षकांची संख्या,सुगम व दुर्गम शाळांची नावे,सर्व शिक्षकांची प्राथमिक माहिती,आधार आणि पॅन कार्ड क्रमांकाची पुर्नपडताळणी करण्याचे सांगण्यात आले आहे.ग्रामविकास विभागाने मोबाईल ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांसाठी प्रत्येक शिक्षकांना मोबाईल नंबर अनिवार्य केला आहे.
हे पण पहा 👉 ऑनलाईन शिक्षक बदली धोरण,टप्पे,जीआर,निकष,संवर्ग इ.सर्व माहिती
आपसी बदली शिक्षकांची सेवा धरण्याचे आदेश
दरम्यान आपसी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांनी 1967 अधिनियमाच्या आधारे आपसात बदली झालेल्या कनिष्ठ शिक्षकांनी बदली साठी सेवाग्राह्य धरण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.सदरील याचिकेवर 21 एप्रिल रोजी सुनावणी झाली आणि याचिका कर्त्या आपसी आंतरजिल्हा बदली शिक्षकांची कनिष्ठ सेवा ग्राह्य धरण्याचे मा.उच्च न्यायालयाने आदेश दिले आहे.त्यानूसार 29 एप्रिल पर्यंत सदरील बदल करण्याचा आदेश मा.उच्च न्यायालयाने संबधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.आपसी बदली शिक्षकांची सेवा धरण्याचे आदेश
शिक्षक बदली
मित्रांनो "शिक्षक बदली"संबधी माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.
सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
0 Comments