Budget 2022 Income tax slab | करदात्यांच्या पदरी पुन्हा निराशा

Budget 2022 income tax slab
Budget 2022 income tax slab

Budget 2022 Income tax slab करोनामुळे बसलेला आर्थिक फटका,वाढती बेरोजगारी,मागील वर्षी न मिळालेला कर दिलासा,पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारकडून यंदा कर सवलत मिळण्याची अपेक्षा होती.मात्र अर्थमंत्री म्हणून आपला चौथा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्य करदात्यांना यंदा कोणताही दिलासा दिलेला नाही.अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅब बदलणार नसल्याचं जारी केल्याने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचं प्राप्तीकर संकलन हे २०२० च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या रचनेप्रमाणेच असेल.हीच करप्रणाली २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात लागू करण्यात आली. याच रचनेनुसार पुढील वर्षभर म्हणजेच २०२२-२३ च्या आर्थिक वर्षामध्ये करसंकलन केलं जाणार आहे.

Income tax slab 2022-2023

  आताच्या करसंरचनेप्रमाणे पाच लाख ते साडेसात लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के , दहा ते १२ लाख ५० हजार रूपये उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के कर भरावा लागतो.१५ लाखांच्या पुढे उत्पन्न असणाऱ्यांना यापुढे ३० टक्के प्राप्तीकर भरावा लागतो. हीच करसंरचना पुढील वर्षभर कायम राहणार आहे.'Income tax slab 2022-2023'

अशी असेल आर्थिक वर्ष २०२२-२३ ची करप्रणाली

Budget 2022 Income tax

– ५ लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. 
– ५ ते ७.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर असेल. 
– ७.५ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर भरावा लागणार
– १० ते १२.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर भरावा लागणार
– १२.५ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के कर भरावा लागणार
– १५ लाखांपुढच्या उत्पन्नावर पुढे ३० टक्के कर भरावा लागणार Budget 2022 Income tax


पण पहा👉 पगार खात्याचे (Salary Account) फायदे


अर्थ संकल्प 2022

     मित्रांनो "अर्थ संकल्प 2022" विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली तर नक्कीच शेअर करा.


हेही पहा 👉 2022 मध्ये कोणती बॅंक देत आहे सर्वात स्वस्त वैयक्तीक कर्ज ? 

     

 सदरील लेखा मधील  कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

Post a Comment

0 Comments