शिक्षक बदली 2022 : सर्व अपडेट्स | Online Transfers Zilha Parishad Teacher

  शिक्षक बदली  शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हान्तर्गत बदल्यासाठी सुधारीत धोरण दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी जाहीर केले आहे. या लेखात आपण ऑनलाईन शिक्षक बदली प्रकिया कशी राबविण्यात येणार आहे याची माहिती पाहणार आहोत. 

      

Teacher transfer
Teacher transfer

शिक्षक बदली महाराष्ट्र 2022

 

ग्रामविकास विभागामार्फत ऑनलाईन बदली सॉफ्टवेअर मध्ये सरल आणि शालार्थ मार्फत माहिती प्राप्त झाली असून सदर माहिती EXCEL SHEET मध्ये तयार केली आहे. या माहितीच्या आधारे बदली प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.ही माहिती गटशिक्षणाधिकारी,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक यांच्या मार्फत अद्ययावत करुण बदली पोर्टल मध्ये संरक्षित करूण बदली प्रकिया पार पाडली जाणार आहे. माहितीमध्ये दुरुस्ती अथवा नोंदणी करतांना मुळ EXCEL SHEET केंद्र स्तरावर उपलब्ध करून दिली जाईल.एक्सल शीट मध्ये कसलाही बदल अथवा अतिरिक्त फॉर्मुला नोंदवता येणार नाही.तसेच ग्रामविकास विभागाच्या मुळ EXCEL SHEET मध्ये केलेले बदल अथा नोंदविलेली माहिती ही प्रत्यक्ष कर्मचा-यांच्या मुळ दस्तऐवज / अभिलेख्यांवरून पडताळून करण्यात येणार आहे.आता ही माहिती अद्ययावतीकरण करण्यासाठी खालील पध्दतीचा अवलंब करावा लागणार आहे. 

1) माहिती अतिशय काळजीपूर्वीक दुरुस्त केली जावी व अचूक भरावी.सर्व महिती English अक्षर व अंका मध्येच भरावी. 

2) ज्या EXCEL CELL च्या माहितीमध्ये दुरुस्ती अथवा बदल केला असेल त्याचे Background Yellow (पिवळ्या रंगात) दर्शवावे.

3) तालुक्यातुन बदली झालेल्या मयत इ.वगळावयाचे शिक्षकाच्या माहितीस Background Red (लाल) रंगात दर्शवावे तसेच तालुक्यात बदली पदोन्नतीने ने रुजु झालेल्या अथवा नवनियुक्त शिक्षकाचे नाव नव्याने समाविष्ट केले असेल तर Background Green हिरव्या रंगाता दर्शवावे.

4) EXCEL CELL मधील Saral ID या रकान्यापासून पुढील रिक्त (Blank Column) रकान्यात नव्याने माहिती भरावी लागत असल्याने त्यांचे Background रंगात दर्शविण्याची आवश्यकता नाही. 

5) सर्व नावांची सुरुवात प्रथम नाव, वडीलांचे / पतीचे नांव,आडनांव (First name Middle Name Surname) या क्रमाने असून शिक्षकाच्या नावाचे स्पेलिंग अचूक तपासावे.बदल असल्यास योग्य ती दुरुस्ती करावी.

6) जन्म दिनांक (DOB) अचूक असल्याची खात्री करावी.जन्म तारखेत बदल असल्यास मुळ कागदप्रत्रांवरुन पडताळणी करुन योग्य ती दुरुस्ती करून घ्यावी.

7) EXCEL SHEET च्या अपडेशन कामकाजास सुरुवात करण्यापूर्वी आपल्या संगणकाचा Date Format DD-MMYYYY करुन घ्यावा. म्हणजे दिनांक व महिना यांचा क्रम उलटा (MM-DD-YYYY) होणार नाही.

हे पण पहा 👉 अशी भरा शिक्षक बदली पोर्टलवर माहिती 

8) GENDER काळजीपूर्वक पहावे व योग्य ती दुरुस्ती करावी. 9)MARITAL STATUS मध्ये MARRIED / UNMARRIED यापैकी एक पर्याय निवडावा.

10) मोबाईल क्रमांक (CELL NO) रकान्यात मध्ये आज रोजी वापरातील व आधार कार्डशी संलग्न असलेला १० अंकी अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा.आवश्यकता असल्यास बदल करावा. दिलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार असल्यामुळे SMS सुविधा कार्यान्वीत असल्याची खात्री कर्मचा-यांनी करून घ्यावी. पती-पत्नी हे दोन्हीही सेवेत असल्यास स्वतंत्र मोबाईल क्रमांक नोंदविण्यात यावा.

11) Adhaar Number रकान्यात बारा अंकी अचूक Adhaar Number नमुद केला आहे का ते तपासावे.योग्य ती दुरुस्ती करावी.

12) PAN NO मधील एकुण अंक व अक्षरांची संख्या १० असते.त्यात सुरुवातीचे पाच अक्षरे (Capital) त्यानंतर चार अंक व शेवटी पुन्हा एक अक्षर (Capital) असते, PAN NO अचुक असल्याची खात्री करावी.

13) EMAIL ID हा वैयक्तिक वापरातील संबंधीतास पासवर्ड ज्ञात असलेला व अचूक नमुद करावा. इतरांचा ई-मेल देण्यात येवू नये.

14) SHALARTH ID मध्ये कोणताही बदल करु नये.बाहेर जिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या शिक्षकांचा SHALARTH ID हा शालार्थ वेतन प्रणालीच्या (INNER PAGE) वरुन खात्री करुनच नोंदवावा.


हे पण पहा👉 पगार खात्याचे (Salary Account) फायदे


15) Date of Appointment अचुक नोंदवावी. येथे मुळ सलग सेवा दिनांक अपेक्षीत आहे. (मुद्दा क्रमांक ७ प्रमाणे)

16) EMP SERVICE END DATE तपासतांना मुद्दा क्रमांक ७ प्रमाणे तारखेचा फॉरमॅट DD-MM-YYYY असाच असावा. 

17) UDISE हा शिक्षकाच्या सध्याच्या कार्यरत शाळेचा व १० अंकी अचूक आहे का याची खात्री करावी.

18) DESIG DESC मध्ये Headmaster / Graduate Teacher std (६-८) / Under Graduate Teacher std (१-४/५. Shikshan Sewak ) या पैकी एक अचूकपणे नमुद करावे.

19) DESIGNATEACHINGION TEACHINGYPE मध्ये सर्वांसाठी TEACHING नोंद आवश्यक आहे.

20) Current school name मध्ये सध्याच्या शाळेचे नाव आहे का ते तपासावे बदल असल्यास UDISE प्रमाणे अचूक नाव नोंदवावे व UDISE च्या रकान्यातही योग्य तो बदल करावा. (शाळेचे नांव- ZPPS BORGAON असे नमुद करावे.) 

21) शाळेचे नाव बदलल्यास VILLAGE रकान्यात योग्य ती दुरुस्ती करावी

ऑनलाईन शिक्षक बदली प्रकिया

22) QUALIFICATION (शैक्षणिक पात्रता) व MORE QUALIFICATION (व्यावसायीक पात्रता) तपासून घ्यावी. तृटी असल्यास बदल करावा. 

23) ADDRESS BUILDING, ADDRESS STREET, LANDMARK, LOCALITY, PINCODE अचूक तपासावा योग्य तो बदल करावा. 

24) EXCEL FILE मधील "AB" या पूढील सर्व (BLANK) रकान्यात नव्याने माहिती नोंदवायची आहे. Saral ID सात अंकी असतो तो अचूक नोंदवावा या Cell ला Text Format करु नये तसेच सुरूवातीला शुन्य येण्यासाठी अंका व्यतीरिक्त इतर कोणतेही चिन्ह (SPECIAL CHARACTER) टाकू नये. (सुरुवातील शुन्य नाही आला तरी चालेल)

25) Caste Category मध्ये SC / ST / SBC/ VJA/ NTB/NTC/NTD/OBC/OPEN या पैकी जे योग्य असेल ते नमुद करावे.

26) Teaching Medium मध्ये Marathi / Urdu यापैकी अचूक असेल ते नोंदवावे.

27) Teacher Type मध्ये Headmaster / Graduate Teacher std (६-८) / Under Graduate Teacher std (१-४/५) या पैकी एक अचूकपणे नमुद करावे.

हेही पहा 👉 राज्यातील शाळांसंबधात मोठा निर्णय ! 

28) Teacher Specialization या रकाण्यात प्राथमिक पदविधर Graduate Teacher std (६-८) साठी Science Math / Language / Social Science या पैकी एक व Headmaster Under Graduate Teacher std (१४/५) यांच्यासाठी All Subjects असे नोंदवावे.

29) Appointment Category मध्ये नियुक्तीचा प्रवर्ग SC / ST / SBC / VJA / NTB / NTC / NTD / OBC / OPEN/ PARALLEL 3/N RESERVATION या पैकी जे योग्य असेल तो नमुद करावा..

30) Service type मध्ये Permanent / Temporary जे योग्य असेल ते नोंदवावे. 

31) Confirmation date स्थायीत्व दिनांक नोंदवावी. याठिकाणी स्थायीत्वाचा लाभ देय असलेला दिनांक नोंदवावा.

32) Total Service years दि ३१/०५/२०२२ अखेरीच एकुण सेवा DD-MMYY या Format मध्ये नमुद करावी.

33) Last Transfer category या रकाण्यात या पूर्वी सरल प्रणालीद्वारे ऑनलाईन बदली झाली असल्यास SP9/SP२ / TBR / TUC / DISPLACED TUC / OTHER/NA या पैकी एक अथवा बदली झाली नसल्यास NA असे नमुद करावे.

34)Last working date in difficult area या रकान्यात या पूर्वी अवघड क्षेत्रात काम केले असल्यास सर्वसाधारण क्षेत्रातील हजर दिनांक नमुद करावा. या पूर्वी अवघड क्षेत्रात काम केले नसल्यास सदरचा रकाना रिक्त ठेवावा.

35) Current School joining date सध्याच्या शाळेतील हजर दिनांक नोंदवावा.

36) Current school UDISE सध्याच्या शाळेचा १० अंकी अचूक UDISE क्रमांक नोंदवावा. 


हे पण पहा 👉ऑनलाईन शिक्षक बदली धोरण,टप्पे,जीआर,निकष,संवर्ग इ. सर्व माहिती


37) Current district joining date सदर रकाना भरताना शिक्षकाची अंतर जिल्हा बदली झालेली नसल्यास Date of Appointment याच रकाण्यातील दिनांक भरावी. जर शिक्षक अंतर जिल्हा बदलीने हजर झाला असेल तर जालना जिल्हातील हजर दिनांक भरावी (याबाबत आपसी आंतरजिल्हा बदली सेवाजेष्ठतेचा शासन आदेश वाचावा,म्हणजे आपसी बदली मधील दोघांपैकी कनिष्ठ सेवा टाकावी)

38)Current district joining date व Date of Appointment या दोन दिनांकात बदल असल्यास संबंधीत शिक्षक अंजिब ने हजर झाला आहे असे समजण्यात येईल.(आपसी आंतरजिल्हा बदली झालेल्यांसाठी आजिब सेवा जेष्ठता आदेश पहावा) 

39) वरील माहिती व्यतिरिक्त आणखी काही विशेष नोंद स्वतंत्रपणे निदर्शनास आणून द्यावयाची असल्यास सर्वात शेवटी तयार करुन देण्यात आलेल्या "REMARKS" या रकान्यात संक्षीप्तपणे सोप्या शब्दांत नोंद करावी लागेल. ऑनलाईन शिक्षक बदली प्रकिया


हे पण पहा 👉 बिटकॉईन म्हणजे काय ? खरेदी करावे का ? फायदे,तोटे काय?     


Online Teacher transfer Maharashtra

  गटशिक्षणाधिकारी हे उपरोक्त बदली प्रक्रीयेची कार्यवाही करतांना शाळा केंद्रस्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांना येणा-या तांत्रीक - प्रशासकीय अडचणी व समस्या सोडविण्यासाठी गटस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करतील.

मित्रांनो "Online Teacher transfer Maharashtra"संबधी माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.

       सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 


Post a Comment

0 Comments